Marathi News Videos Unseasonal rain in nanded district Groundnut production has drastically decreased due to untimely rains

अवकाळीचा भूईमूग पिकाला फटका, पिकांवर विपरीत परिणाम बळीराजा चिंतेत
VIDEO | गेल्या दिवसापासून सातत्याने पडत असलेल्या अवकाळीचा पिकांवर विपरीत परिणाम, भुईमूगाचं नुकसान झाल्यानं बळीराजा हवालदिल
नांदेड : राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. तर अवकाळी आणि वादळ वाऱ्यानं अनेकांचे संसारही उघड्यावर पडले आहेत. अशातच नांदेडमध्ये गेल्या बारा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्याने उन्हाळी पिकांवर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेषतः नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भुईमुंग पीक घेतले जाते. मात्र भुईमुंग पीक ऐन परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना सातत्याने अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे भुईमुंग पिकांच्या शेंगाला जमिनीतच कोंब फुटले आहेत. गरज नसताना अवकाळी पाऊस पडल्याने भुईमुंगाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
Published on: May 08, 2023 3:12 PM
Related Video
अभिनेत्रीचा हट्ट अन् घडला इतिहास, 1947 चं गाणं ठरलं प्रचंड सुपरहिट
GK : कोणत्या राज्यातील लोकांचे सरासरी उत्पन्न जास्त?
Organ Meat : मटणातील कलेजी,गुर्दा, भेजा आवडीने खाताय ? या लोकांनी सावध
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चीनकडून भारताचा सर्वात मोठा घात! लपून उभा केला वॉटर बॉम्ब
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई
तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांचा धाराशिवला मोठा फायदा
वाशिममध्ये नदी-नाले दुथडी, अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती
विदर्भातील शाळेची घंटा आज वाजली, विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव साजरा
भंडारा जिल्ह्यात शाळांची पहिली घंटा! ढोल-ताशांचा गजर, आणि फुलांची उधळण करत विद्यार्थ्यांचे स्वागत