Iran Israel War | अमेरिका, इस्त्रायल, इराण संघर्षामुळे जागतिक तेल बाजारावर परिणाम; पेट्रोलचे दर काय?
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, ज्यामुळे आयात–निर्यात क्षेत्रावरही मोठा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.
अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाल्याने जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, ज्यामुळे आयात–निर्यात क्षेत्रावरही मोठा फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांनी सांगितले. पेट्रोलचे दर वाढतील अशी अपेक्षा असूनही मुंबई आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावर पेट्रोलचे दर स्थिर आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकशे तीन रुपये व पन्नास पैसे इतका दर कायम आहे. विशेष तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात, ज्याचा भारतासारख्या मोठ्या देशावर आर्थिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी परिस्थितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
Published on: Mar 01, 2026 3:04 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
