संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत… विकास लवांडेंनी काळभोर पोलीस स्टेशन गाठलं भंडारींना अटक होईपर्यंत…

संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत… विकास लवांडेंनी काळभोर पोलीस स्टेशन गाठलं भंडारींना अटक होईपर्यंत…

| Updated on: May 09, 2026 | 3:01 PM

वारकरी संप्रदायातील घुसखोरीच्या मुद्द्यावरून राज्यात वाद सुरू असतानाच आळंदीत मोठा गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर सकाळच्या वेळेत काळी शाई फेकण्यात आली. हवेली तालुक्यातील म्हातोबाची आळंदी येथे हा प्रकार घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, ह.भ.प. संग्राम भंडारे यांनी समर्थकांसह विकास लवांडे यांना लक्ष्य केले. वारकरी संप्रदायातील संत, साधू आणि गुरुवर्यांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी व्यक्त करत ही कृती करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात काही कट्टर विचारांचे लोक शिरल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे विविध धार्मिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. दरम्यान, या घटनेनंतर विकास लवांडे यांनी स्वतःच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

यावेळी विकास लवांडे म्हणाले, ‘संग्राम भंडारे याने स्वतःच्या गुंड लोकांना घेऊन जवळपास मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एका दोघाने मला रिव्हॉल्व्हर दाखवली, आणि ‘तुझा खात्मा करू’ असं सांगितलं. त्यामुळे या लोकांना अटक होईपर्यंत मी काळभोर पोलीस स्टेशन सोडणार नाही.’

Published on: May 09, 2026 03:01 PM
Follow Us