Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?

| Updated on: Jul 18, 2026 | 3:58 PM

पश्चिम रेल्वेच्या वसई स्थानकात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, धावत्या मेल एक्सप्रेससमोर एका तरुणाने जीवघेणा स्टंट केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांमध्ये आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणाने स्थानकावर उभ्या असलेल्या लोकल ट्रेनच्या दरवाजातून थेट रेल्वे रुळावर उडी मारली. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने मेल एक्सप्रेस येत असतानाही त्याने हा जीवघेणा प्रकार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

दोन्ही बाजूंना रेल्वेची हालचाल सुरू असताना तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालत केलेली ही स्टंटबाजी कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, या प्रकारामुळे रेल्वे सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे प्रशासनाकडून या व्हिडिओची पडताळणी करण्यात येत असून, संबंधित तरुणाची ओळख पटवून त्याच्यावर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अशा प्रकारचे जीव धोक्यात घालणारे स्टंट करू नयेत, तसेच रेल्वे परिसरात सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Jul 18, 2026 3:58 PM
Follow Us