मविआत फूट पडणार? “आता उद्धव ठाकरे यांनी ‘एकला चलो’ची भूमिका घ्यावी”, विनायक राऊत यांचा सल्ला
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या एका खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला आहे.
रत्नागिरी : शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आहे. अजित पवार हे 30 आमदारांसह राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या एका खासदाराने तर उद्धव ठाकरे यांनी आता एकला चलो रेची भूमिका घ्यावी, असा सल्ला दिला आहे.ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना हा सल्ला दिला आहे. राज्यात शिवसेनेने एकला चलो रेची भूमिका घ्यायला पाहिजे. राज्यातील जनतेची तशी इच्छा आहे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फुटणार काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
Published on: Jul 03, 2023 1:01 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
