Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात कथितपणे बेकायदेशीर सुविधा...
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा कारागृहात कथितपणे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याच्या आरोपामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यासंदर्भात बीड कारागृह अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. राजकीय प्रभावामुळे कराडला कारागृहात विशेष सुविधा मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. इतर कैद्यांच्या नावावरून आणि वकिलांच्या सिमकार्डद्वारे बाहेरील व्यक्तींशी संपर्क साधला जात असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.
या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत वाल्मिक कराडची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची मागणी केली.
तसेच बीड कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज, कॉल लॉग आणि भेट नोंदवही जप्त करून वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोपीला मदत करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही सुळे यांनी केली आहे.
