MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री

MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री

| Updated on: Oct 05, 2026 | 2:29 PM

वर्धा पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कोणताही पक्षाचा पाठिंबा नसतानाही भाजपपासून ते काँग्रेसपर्यंत सर्वच पक्षांतील लोकांचा आणि शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला. ही बंडखोरी नसून, सामान्य पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण रिंगणात उतरल्याचे कराळे यांनी स्पष्ट केले.

वर्धा पदवीधर मतदारसंघातून नितेश कराळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संविधान चौकातून रॅली काढून त्यांनी हा अर्ज भरला. विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून त्यांचे समर्थक या रॅलीत सहभागी झाले होते.

कराळे यांनी पक्षाचा अधिकृत पाठिंबा नसतानाही भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि काँग्रेस यांसह सर्वच प्रमुख पक्षांतील कार्यकर्त्यांचा तसेच शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या लोकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला.

ही बंडखोरी नसून, पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांमध्ये पक्षाचे चिन्ह नसते. त्यामुळे घराणेशाही किंवा प्रस्थापित व्यक्तींसाठी नव्हे, तर शेतकरी पुत्र, बेरोजगार युवक आणि कर्मचारी वर्गाचे प्रश्न मांडण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. एक सुशिक्षित उमेदवार म्हणून चांगले मुद्दे मांडण्याचा आपला प्रयत्न असेल, असे कराळे यांनी सांगितले. यानंतर ते सहाही जिल्ह्यांत दौरे करणार असून, विजयासाठी आत्मविश्वासाने लढणार आहेत.

Published on: Oct 05, 2026 2:29 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us