धरण उशाला अन् कोरड घशाला, घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची पायपीट

धरण उशाला अन् कोरड घशाला, घोटभर पाण्यासाठी आदिवासी महिलांची पायपीट

Harshada Shinkar | Updated on: May 10, 2023 | 9:03 AM

VIDEO | धरणांच्या तालुक्यातच आदिवासी महिलांची पाण्यासाठी वणवण, घोटभर पाण्यासाठी मैलो न् मैल पायपीट, कुणं आहे भीषण टंचाई?

नाशिक : इगतपुरी तालुका (Nashik District) हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो. इगतपुरी तालुक्यात सोळा धरण असूनही आदिवासी पाड्यांवरील महिलांना घोटभर पाण्यासाठी मैलो न् मैल पायपीट करावी लागत आहे. इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी हा आदिवासी पाडा भावली धरणापासून जवळच आहे. मात्र येथील महिलांना जंगलातून पायपीट करत डोंगर दऱ्यातील कपारीतून डबक्यात झिरपणारे पाणी प्यावे लागत आहे. इगतपुरी तालुक्यात असणाऱ्या आदिवासी महिलांची (tribal women) सध्या स्थिती धरण उशाला अण कोरड घशाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. दरवर्षी उन्हाळ्यात इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची समस्या जाणवत असते. भर कडाक्याच्या उन्हात या तालुक्यातील आदिवासी महिला डोक्यावर हंड्यांवर हंडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करताना दिसतात. तशीच परिस्थिती आजही जाणवत आहे.

Published on: May 10, 2023 9:03 AM
Follow Us