राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर, मंत्री तानाजी सावंत आणि अॅड. निलेश देशमुख यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच खासदार ओमराजे निंबाळकर, मंत्री तानाजी सावंत आणि अॅड. निलेश देशमुख यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ही भेट कोणत्याही राजकीय कारणासाठी नसून विकास कामांच्या संदर्भात झाल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव आणि परिसरातील प्रलंबित विकासकामे, निधी मंजुरी तसेच विविध प्रशासकीय विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. ही बैठक जवळपास 1 तास चालली. यावेळी मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि इतर विकास प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, अलीकडच्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे त्यांच्या देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जात आहे. मात्र, संबंधित नेत्यांकडून ही केवळ विकास कामांसाठीची बैठक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
