शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती… व्हिडीओच आला समोर
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत घडल्याचा आरोप असलेल्या एका प्रकारामुळे परिसरात चर्चा रंगली आहे. शाळेच्या वेळेत मुख्याध्यापिका त्यांच्या कॅबिनमध्ये झोपलेल्या आढळल्याचा दावा पालकांनी केला आहे. तसेच त्यांच्या पतीने मद्यधुंद अवस्थेत मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसून पालकांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर ढोके यांनी गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली असून पुढील चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकत संबंधित मुख्याध्यापिकेची तातडीने बदली करण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षिका रुजू झाल्यापासून इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि पटसंख्येवर परिणाम झाल्याचा आरोप आहे.