‘तारीख पे तारीख’नंतर काँग्रेसच्या उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, संभाव्य 39 चेहरे कोण?

पितृपक्ष संपल्यावर नवरात्राच्या मुहूर्तावर म्हणजेच 29 सप्टेंबरनंतर काँग्रेस विधानसभा उमेदवारांची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्याची शक्यता आहे

'तारीख पे तारीख'नंतर काँग्रेसच्या उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला, संभाव्य 39 चेहरे कोण?
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 3:15 PM

मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाही राष्ट्रवादी वगळता मुख्य राजकीय पक्षांनी आपली उमेदवार यादी जाहीर केलेली नाही. काँग्रेसच्या उमेदवार यादीचे (Congress Vidhansabha Candidate List Date) दोन मुहूर्त हुकल्यानंतर अखेर नवीन दिवस ठरला आहे. पितृपक्ष संपल्यानंतर काँग्रेस आपले उमेदवार घोषित करणार आहे.

नवरात्राचा शुभारंभ झाल्यानंतर काँग्रेस आपली पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पितृपक्षामुळे काँग्रेसने आपले उमेदवार जाहीर करणं टाळल्याचं म्हटलं जातं. आधीच गळती लागल्यामुळे काँग्रेस आता शुभ-अशुभाचे शकुन मानत असल्याचं म्हटलं जात आहे.

काँग्रेस आपली पहिली यादी 20 सप्टेंबरला जाहीर करणार असल्याचं आधी म्हटलं जात होतं. त्यानंतर 21 तारखेला विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. त्यामुळे 23 सप्टेंबरला पहिली यादी जाहीर करण्याचा मुहूर्त ठरला, मात्र तोही अखेर लांबला. आता पितृपक्ष संपल्यानंतर नवरात्रात काँग्रेस उमेदवार जाहीर करु शकतं. म्हणजेच रविवार 29 सप्टेंबरनंतर काँग्रेसची पहिली यादी (Congress Vidhansabha Candidate List Date) समोर येईल.

विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांनी बीडमधून पाच उमेदवार जाहीर केले आहेत, तर पुण्याचं जागावाटपाचं सूत्र अजित पवारांनी जाहीर केलं आहे. मात्र राष्ट्रवादी आपले उर्वरित 120 उमेदवार कधी जाहीर करणार हे समजलेलं नाही. जागावाटपाचं सूत्र ठरलेलं असलं, तरी काही जागांवर वाटाघाटीची शक्यता आहे.

काँग्रेसचं ‘सीटिंग गेटिंग’ तत्व

काँग्रेसच्या सीटिंग गेटिंग तत्वानुसार विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार हे निश्चित आहे. 2014 मध्ये काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. मात्र त्यापैकी अनेकांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजप-शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. विशेषत: राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात काँग्रेस कुणाला उमेदवारी (Congress Vidhansabha Candidate List Date) देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

काँग्रेसची संभाव्य यादी

  1. वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
  2. प्रा. वीरेंद्र जगताप- धामणगाव रेल्वे (अमरावती)
  3. अमित झनक – रिसोड (वाशिम)
  4. अॅड. यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
  5. संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)
  6. संग्राम थोपटे – भोर (पुणे)
  7. बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)
  8. अमित विलासराव देशमुख – लातूर शहर (लातूर)
  9. सुरुपसिंह नाईक – नवापूर (नंदुरबार)
  10. अमिन पटेल – मुंबादेवी (मुंबई)
  11. काशिराम पावरा – शिरपूर (धुळे)
  12. कुणाल पाटील – धुळे ग्रामीण (धुळे)
  13. बसवराज पाटील – औसा (लातूर)
  14. अॅड. के. सी. पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
  15. गोपालदास अग्रवाल – गोंदिया (गोंदिया)
  16. धनाजी अहिरे – साक्री (धुळे)
  17. डॉ. विश्वजीत पतंगराव कदम – पलुस कडेगाव (सांगली)
  18. रणजीत कांबळे – देवळी (वर्धा)
  19. अमर शरदराव काळे – आर्वी (वर्धा)
  20. सुनिल छत्रपाल केदार – सावनेर (नागपूर)

    काँग्रेस संभाव्य उमेदवार यादी (Congress Vidhansabha Candidate List Date)

  21. नसीम मोहम्मद आरीफ खान – चांदिवली (मुंबई)
  22. वर्षा एकनाथ गायकवाड – धारावी (मुंबई)
  23. अशोकराव चव्हाण – भोकर (नांदेड)
  24. पृथ्वीराज चव्हाण – कराड दक्षिण (सातारा)
  25. मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (उस्मानाबाद)
  26. त्र्यंबकराव भिसे – लातूर ग्रामीण (लातूर)
  27. आसिफ शेख – मालेगाव मध्यम (नाशिक)
  28. विजय वडेट्टीवार- ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
  29. प्रणिती शिंदे – सोलापूर शहर (सोलापूर)
  30. अस्लम शेख – मालाड पश्चिम (मुंबई)
  31. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
  32. दत्तात्रय सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
  33. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)
  34. पी.एन.पाटील – करवीर (कोल्हापूर)
  35. पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)
  36. नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)
  37. मुजफ्फर हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)
  38. रमेश बागवे – पुणे कन्टोन्मेंट (पुणे)
  39. कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या आघाडीबाबत अद्याप निश्चित झालेलं नाही. आतापर्यंत एमआयएम आणि आप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी आठ-आठ उमेदवार घोषित केलेले आहेत. वंचितने मात्र आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत.

दुसरीकडे, शिवसेना आणि भाजप यांनीही युतीबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. युतीचं घोडं जागावाटपावरुन अडल्याचं म्हटलं जात आहे. युतीच्या घोषणेनंतरच शिवसेना-भाजप आपले उमेदवार जाहीर करतील. मनसेनेही विधानसभा लढवण्याचं निश्चित केलं असलं, तरी त्यांची उमेदवार यादीही गुलदस्त्यात आहे.

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly Poll Dates) निवडणुकांचं बिगुल अखेर 21 सप्टेंबरला वाजलं. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी सोमवार 21 ऑक्टोबर 2019 रोजी मतदान होणार आहे, तर गुरुवार 24 ऑक्टोबर 2019 रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या तारखा (Maharashtra Assembly Election Announcement) जाहीर केल्या. यासोबतच दोन्ही राज्यांत आचारसंहिता लागू झाली.

संबंधित बातम्या 

Congress MLA List 2014 | महाराष्ट्रातील काँग्रेस आमदारांची संपूर्ण यादी   

SHIVSENA MLA List 2014 | महाराष्ट्रातील शिवसेना आमदारांची यादी 2014  

BJP MLA List 2014 | महाराष्ट्रातील भाजप आमदारांची यादी 2014   

NCP MLA List 2014 | राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची यादी

महाराष्ट्रातील सर्व 288 आमदारांची यादी, महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघ   

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.