शिवसेनेकडील खात्यासाठी काँग्रेस आग्रही, विस्ताराआधीच फेरबदलाचा ‘उद्योग’?

काँग्रेसने शिवसेनेकडील उद्योग मंत्रालयाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडील खात्यासाठी काँग्रेस आग्रही, विस्ताराआधीच फेरबदलाचा 'उद्योग'?
Follow us
| Updated on: Dec 25, 2019 | 9:04 AM

मुंबई : ठाकरे मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार कित्येक दिवसांपासून रखडलेला असताना, आता त्याआधीच खातेवाटपात फेरबदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने उद्योग मंत्रालयाची मागणी (Congress Wants Shivsena Ministry) केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तात्पुरत्या खातेवाटपात उद्योग मंत्रालयाची धुरा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्याकडे देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये संभाव्य फेरबदलाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. सध्या शिवसेनेकडे असलेल्या उद्योग मंत्रालयासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसं झाल्यास, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये कोणत्या खात्यांची अदलाबदल होणार, की काँग्रेसला अतिरिक्त खातं मिळणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

काँग्रेसमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे, आमची यादी तयार आहे, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. तर शरद पवारांनीही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीवारीवरुन टोला लगावला होता. त्यामुळे काँग्रेसमुळेच विस्तार लांबणीवर पडत असल्याचं चित्र आहे.

डिसेंबर महिन्याच्या अखेरीस ठाकरे मंत्रिमंडळाचा बहुप्रतीक्षित विस्तार होणार असल्याचं म्हटलं जात आहे. शुक्रवार 27 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरला विस्ताराचा मुहूर्त निघण्याची चिन्हं आहेत. शिवसेनेचे 13, राष्ट्रवादीचे 13 आणि काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. Congress Wants Shivsena Ministry

मंत्रिमंडळ विस्तार कधी आणि उपमुख्यमंत्रिपदी कोण? दोन्ही प्रश्नांची उत्तरं ठरली

काँग्रेसची यादी दोन चव्हाणांच्या मंत्रिपदाच्या आग्रहामुळे रखडली होती. काँग्रेसच्या वाट्याला महसूल, ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम ही 3 महत्वाची खाती आहेत. आता उद्योग खात्याचीही मागणी होत असल्याचं दिसत आहे.

त्यापैकी बाळासाहेब थोरातांकडे महसूल खातं देण्यात आलं. त्यामुळे दुय्यम खात्यांसाठी माजी मुख्यमंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची हायकमांडकडे मागणी करण्यात आली. त्यानुसार काँग्रेसची यादीही दिल्लीत फायनल झाल्याचं कळतंय. त्यामुळे मंत्रिपदी कोणाकोणाची वर्णी लागणार, याबाबत उत्सुकता आहे.

मंत्रिपदासाठी विजय वडेट्टीवार, के. सी. पाडवी, सुनील केदार, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, अमित देशमुख, वर्षा गायकवाड या आमदारांची नावं चर्चेत आहेत.

सध्या उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात एकूण 7 मंत्री आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत अशा सात मंत्र्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच 12 डिसेंबरला तात्पुरते खातेवाटप करण्यात आले.

संबंधित बातम्या :

शिवसेनेतून मंत्रिपदासाठी संभाव्य आणि इच्छुक चेहरे कोण?

आदिती तटकरे, मकरंद पाटील, राजेश टोपे, राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

मंत्रिपदासाठी काँग्रेस नेत्यांची दिल्लीवारी, ‘ही’ सात नावं चर्चेत

Congress Wants Shivsena Ministry

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.