'संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील'

मला तर वाटतंय येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

Sanjay Raut Criticised, ‘संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’

मुंबई : भाजपवासी झालेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे. ‘मला तर वाटतंय येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’ असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे गेल्यावेळ प्रमाणे निलेश राणेंनी यंदाही राऊतांचा एकेरी उल्लेख (Sanjay Raut Criticised) केला आहे.

‘संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, अशी टीका निलेश राणे यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.

‘उद्धव ठाकरे यांना cadbury चॉकलेट द्या, बिचाऱ्याना वाईट वाटलं खोटारडा म्हटलं म्हणून. शाळेत असल्यासारखा वाटलं त्यांना बघून.’ अशा शब्दात निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही टीका केली होती. त्याहीवेळी उद्धव ठाकरेंचा निलेश राणेंनी एकेरी उल्लेख केला होता.

Sanjay Raut Criticised, ‘संजय राऊतांना काही दिवसांत शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’

राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद जुना आहे. राज्यात सत्तास्थापनेवरुन संघर्ष सुरु असताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करणं टाळलं होतं. परंतु निलेश राणे यांनी तिखट भाषेत समाचार घेतला आहे.

संजय राऊत यांना टीव्ही, तर उद्धव ठाकरेंना कॅडबरी द्या : निलेश राणे

याआधीही, आदित्य ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची तयारी बंधू नितेश राणे यांनी दाखवली असतानाच निलेश राणे यांनी ट्विटरवरुन असहमती दर्शवली होती. मात्र मीडियाने माझ्या ट्वीटचा गैर अर्थ काढला, नितेशची साथ मी मरेपर्यंत सोडणार नाही. पण ज्या दिवशी शिवसेना राणेसाहेबांची बदनामी थांबवेल, तेव्हा माझा आणि शिवसेनेचा विषय संपेल, अशी भूमिका निलेश राणे यांनी घेतली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *