उदयनराजे होल्डवर, साताऱ्यातील पोटनिवडणूक तूर्तास नाही

केंद्रीय निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा न केल्यामुळे उदयनराजे यांना तूर्तास दिलासा मिळालेला नाही

उदयनराजे होल्डवर, साताऱ्यातील पोटनिवडणूक तूर्तास नाही
Follow us
| Updated on: Sep 21, 2019 | 2:16 PM

सातारा : साताऱ्यातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर मिळवलेल्या खासदारकीचा राजीनामा देत उदयनराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला, मात्र राजे तूर्तास होल्डवरच (Satara Loksabha Bypoll Hold) आहेत. कारण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसोबत साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक जाहीर होईल, असा अंदाज बांधला जात होता. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणुकांची घोषणा न केल्यामुळे उदयनराजे ‘गॅसवर’ (Satara Loksabha Bypoll Hold) आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी खासदार श्रीनिवास पाटील यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेसाठी उदयनराजे भोसले विरुद्ध श्रीनिवास पाटील अशीच लढत होणार असल्याचं मानलं जात आहे. सुरुवातीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पोटनिवडणुकीत उतरवणार असल्याची चर्चा (Satara Loksabha Bypoll Hold) होती.

दुसरीकडे, बिग बॉस 2 मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेले अभिजीत बिचुकले यांनीही पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केला आहे. आतापर्यंत बिचुकलेंनी अनेक वेळा निवडणूक लढवली आहे. मात्र बिग बॉसमुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर बिचुकलेंचे मतदार वाढणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं झाल्यास उदयनराजेंना दोन्ही उमेदवार तगडी टक्कर देऊ शकतात.

राजकीयदृष्ट्या महाराष्ट्राचा विचार केला, तर पहिल्यापासून सातारा जिल्ह्याची ओळख राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी राहिली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच या जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड राहिली. गेल्या 2 टर्म छत्रपती उदयनराजे भोसले हेच राष्ट्रवादीकडून खासदार म्हणून निवडून येत आहेत. यंदाही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र तीनच महिन्यात त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला.

उदयनराजेंविरुद्ध आघाडीचा एक्का बाहेर, पोटनिवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी?

मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंनी शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांचा पराभव केला होता.  उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मतं, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार498 मतं मिळाली. उदयनराजे भोसले यांनी मागील 2014 च्या निवडणुकीत जवळपास साडेतीन लाख मतांनी विजय मिळवला होता. मात्र यंदा त्यांची आघाडी निम्म्याने घटली. 2014 मध्ये उदयनराजे भोसले 3 लाख 66 हजार 594 मतांनी विजयी झाले होते. यंदा उदयनराजेंना इतकं लीड घेता आलं नाही. 2019 च्या निवडणुकीत राजेंना 1,26,528 मतांनी विजय मिळवता आला.

भाजप सरकारने पैसे दिल्याने सातारा शहरातील पुढील 50 वर्षांसाठी पाण्याच प्रश्न मिटला. तसेच पर्यटनचाही विकास झाल्याने पर्यटकही साताऱ्याकडे वळू लागले,” अशा शब्दात उदयनराजेंनी भाजप सरकारची स्तुती केली होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.