Solapur : 10 किलो कांद्याच्या भावात एक कोथिंबीरीची जुडी, अल्पावधीत विक्रमी उत्पादन

शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. त्याप्रमाणेच कोथिंबीरची अवस्था आहे. उन्हाळी हंगामातील कोथिंबीरच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या लग्नसराई जोमात सुरु असून कोथिंबीरच्या मागणीत वाढ होत आहे.

Solapur : 10 किलो कांद्याच्या भावात एक कोथिंबीरीची जुडी, अल्पावधीत विक्रमी उत्पादन
कोथिंबीर
सागर सुरवसे

| Edited By: राजेंद्र खराडे

May 31, 2022 | 12:33 PM

सोलापूर : मुख्य पिकांच्या दरापेक्षा गेल्या काही दिवसांपासून (Vegetable) भाजीपाल्यातील घसरते आणि विक्रमी दराची चर्चा जोरात सुरु आहे. आतापर्यंत कांद्याच्या घटत्या दरावरुन वेगवेगळे आकडे समोर येत आहेत. (Solapur Market) सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा कांद्याची विक्रमी आवक झाली होती. एवढेच नाही तर सर्वात निच्चांकी दरही याच बाजारेपेठत मिळाला आहे. आता एका (Cilantro) कोथिंबिरीच्या जुडीमध्ये 10 किलो कांदा येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. कारण सध्या कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला एक अशी स्थिती आहे. त्यामुळे कोथिंबीर उत्पादकांना अच्छे दिन आल्याचे चित्र बाजारपेठेमध्ये पाहवयास मिळत आहे.

मागणी वाढल्याने विक्रमी दर

शेती मालाच्या उत्पादनापेक्षा बाजारपेठेत त्याला काय दर आहेत यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण ठरते. शिवाय आवक घटून मागणी वाढली की मालाच्या किंमतीमध्ये वाढ होणार हे बाजारपेठेचे सूत्रच आहे. त्याप्रमाणेच कोथिंबीरची अवस्था आहे. उन्हाळी हंगामातील कोथिंबीरच्या उत्पादनात घट झाली आहे. सध्या लग्नसराई जोमात सुरु असून कोथिंबीरच्या मागणीत वाढ होत आहे. केवळ जिल्हाभरातूनच नाही तर उस्मानाबाद, बीड, परंडा, शिरूर, चाकण या भागातून मोठी मागणी आहे. त्यामुळे 5 रुपायाला मिळणारी कोथिंबीरची जुडी आता 20 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

अधिकच्या उन्हामुळे उत्पादनात घट

वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावरही झाला आहे. कोथिंबीर हे अल्पावधीचे पीक असले तरी मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात उन्हाचा कडाका वाढला होता. त्यामुळे कोथिंबीर वाढीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे उत्पादन घटले शेतकऱ्यांना आता अधिकचा दर मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. यंदा कोथिंबीरच्या लागवडीमध्ये मुळातच घट झाली होती. यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली होती. याचा परिणाम म्हणून कोथिंबीरच्या जुडीला 20 रुपये तर दुसरीकडे कांद्याला 2 रुपये किलो असा दर आहे.

हे सुद्धा वाचा

दोन एकरातून लाखोंचे उत्पन्न

सोलापूर जिल्ह्यातील राजुरी येथील शेतकरी राजेंद्र भोसले यांनी तब्बल 2 एकरामध्ये कोथिंबीरची लागवड केली होती. लागवडीपासून पाण्याचे योग्य नियोजन केल्याने मागणी असतानाच कोथिंबीर ही विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. त्यामुळे कोथिंबीरमधून भोसले यांना लाखोंचे उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे कोणत्या पिकातून शेतकऱ्याला लाभ मिळेल हे न सांगता येण्यासारखे आहे. कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तर कोथिंबीरमुळे आनंदाश्रु अशी अवस्था झाली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें