AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी 70 टक्के पेरण्या खोळंबल्या

राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे.

अकोल्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, पावसाअभावी 70 टक्के पेरण्या खोळंबल्या
महाराष्ट्रातील शेतकरी (फोटो प्रातनिधिक)
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 11:59 AM
Share

अकोला : जुलै महिना उजाडला तरी अकोला जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झालं आहे. अकोला जिल्ह्यात अद्याप 70 टक्के क्षेत्रात पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असून त्यांच्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Akola farmers in Crisis 70 percent sowing was delayed due to lack of rains)

राज्यात यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. राज्यात दमदार पाऊस बरसणार आणि पिकंही चांगले होणार अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला होती. पण सुरुवातीचे काही दिवस बरसल्यानंतर पावसाने अक्षरशः पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मायबाप शेतकरी चिंतेत

सद्यस्थितीत अकोला जिल्हात अधूनमधून थोड्या फार सरी कोसळतात. यामुळे काही प्रमाणात पिकाला जीवदान मिळत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 29 टक्के क्षेत्रात पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र, जुलै महिना उजाडला, तरी पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये 70 टक्के पेरण्या रखडल्या आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येत्या दोन – चार दिवसांमध्ये पाऊस न झाल्यास पिके सुकू शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा मायबाप शेतकरी हा चिंतेत सापडला आहे.

कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट

अकोला जिल्हात आतापर्यंत सरासरीपेक्षा 95.5 मिमी पाऊस पडला आहे. अकोल्यात आतापर्यंत 170 मिमी पावसाची अपेक्षा होती. पण 95.5 मिमी पाऊस पडल्याने 70 टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन उपलब्ध आहे ते शेतकरी पिकांना पाणी देऊन पिके जगवत आहे. पण कोरडवाहू शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे

अकोल्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस?

तालुका – पाऊस (मिमीमध्ये)

  • अकोट – 49.4 मिमी
  • तेल्हारा – 84.0 मिमी
  • बाळापूर – 73.4 मिमी
  • पातूर – 121.6 मिमी
  • अकोला – 74.8 मिमी
  • बार्शी टाकळी – 137.3 मिमी
  • मूर्तिजापूर – 155.5 मिमी

(Akola farmers in Crisis 70 percent sowing was delayed due to lack of rains)

संबंधित बातम्या : 

राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस नाही, मनमाडमध्ये पेरण्या खोळंबल्या, बळीराजा चिंतेत

Weather Alert : पुढील 5 दिवसात पाऊस कुठे पडणार? हवामान विभागानं काय सांगितलं, सिंधुदुर्गात पावसाचं कमबॅक

अहमदनगर जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, बळीराजा अडचणीत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.