AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM kisan Yojna : बॅंक खात्याला आधारकार्ड संलग्न तरच मिळणार योजनेचा ‘आधार’, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय

पीएम किसान योदनेत नियमितता साधण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन नियम लागू केले जात आहेत. e-KYC साठी मुदतवाढ करण्यात आली असली तरी आता ज्या शेतकऱ्यांचे आधारकार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे त्याच खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे.

PM kisan Yojna : बॅंक खात्याला आधारकार्ड संलग्न तरच मिळणार योजनेचा 'आधार', शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना
| Updated on: Apr 02, 2022 | 12:43 PM
Share

पुणे : (PM Kisan Yojna) पीएम किसान योदनेत नियमितता साधण्यासाठी दिवसेंदिवस नवनवीन नियम लागू केले जात आहेत. e-KYC साठी मुदतवाढ करण्यात आली असली तरी आता ज्या शेतकऱ्यांचे  (Aadhar Card) आधारकार्ड हे बॅंक खात्याशी संलग्न आहे त्याच खात्यावर पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे e-KYC बरोबरच शेतकऱ्यांना आपले आधार कार्ड हे (Bank Account) बॅंक खात्याशी संलग्न आहे की नाही याची तपासणी करावी लागणार आहे. मात्र, राज्यातील तब्बल 17 लाख 50 हजारहून अधिक शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी संलग्नच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे मदतवाटपात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

अशी आहे आधार कार्ड लिंकची स्थिती

पीएम किसान योजनेचे राज्यात 1 कोटी 9 लाख 33 हजार 298 शेतकरी हे योजनेचे लाभार्थी आहेत. असे असतानाच 1 कोटी 6 लाख 53 हजार 329 खातेदारांनी माहिती आधार नोंदणीनुसार प्रमाणित केली आहे. योजनेला तीन वर्ष पूर्ण झाले असतानाही 2 लाख 79 हजार शेतकऱ्यांनी आधार क्रमांकच सादर केला नाही. त्यामुळे दिलेली माहितीमध्ये काही चूक असेल किंवा त्यांची नावे ही प्रमाणित झालेली नाहीत. त्यामुळे 11 व्या हप्त्याचे पैसे खात्यामध्ये जमा होणार की नाही याबाबत साशंका उपस्थित केली जात आहे. 11 वा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

आधारची समस्यावर तोडगा काय ?

ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड हे खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांनी बॅंकेमध्ये जाऊन आधारची माहिती खात्याशी संलग्न करुन घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांना थेट लाभाचा फायदा होणार आहे. ज्या लाभार्थ्यांनी योजनेत नोंदणी करताना आधार क्रमांक दिलेला नाही किंवा आधारमध्ये काही त्रुटी आहेत अशा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे.

शेतकऱ्यांकडे आता 2 महिन्याचा कालावधी

जानेवारीमध्ये 10 हप्ता जमा झाल्यानंतरच e-KYC हे बंधनकारक राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्चपर्यंत शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार होती. एवढेच नाही तर ज्या शेतकऱ्यांनी e-KYC केले नाही अशा शेतकऱ्यांची नावे ग्रामपंचायतीमध्ये प्रसिध्द करण्यात आली आहेत. त्यानुसार आधार कार्ड, बॅंक पासबुक, मोबाईल नं.याची पूर्तता करुन शेतकऱ्यांना e-KYC करता येणार आहे.

संबंधित बातम्या :

Gudi Padawa : शेतकरीही साधतो पाडव्याचा मुहूर्त, काय आहे सालगड्याची परंपरा? वाचा सविस्तर

Rabi Season : पीक पदरात आता चिंता जनावरांच्या चाऱ्याची, ज्वारीपेक्षा कडब्याला अधिकचा दर

Rabi Season : हंगामाच्या अंतिम टप्प्यात स्प्रिंक्लरचाच आधार, पाणीसाठा मुबलक तरीही शेतकरी का आहे त्रस्त?

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....