Silk Farming : शेतीचे बदलते स्वरुप, रेशीमचे उत्पादन अन् कोष खरेदीही, कोट्यावधींची उलाढाल

उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, रेशीम शेतीचा बदल मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या चांगलाच पचनी पडलेला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा रेशीम शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर याचा दुहेरी फायदा झालेला आहे.

Silk Farming : शेतीचे बदलते स्वरुप, रेशीमचे उत्पादन अन् कोष खरेदीही, कोट्यावधींची उलाढाल
संग्रहीत छायाचित्र

परभणी : शेती व्यवसयात बदल केल्याने उत्पादनात वाढ कशी होते हे मराठवाड्यातील शेतकरी सध्या दाखवून देत आहेत. उत्पादन वाढीसाठी अनेक प्रयोग शेतकऱ्यांनी केले आहेत. मात्र, (Silk Farming) रेशीम शेतीचा बदल (Marathwada) मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या चांगलाच पचनी पडलेला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये यंदा रेशीम शेतीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर याचा दुहेरी फायदा झालेला आहे. कारण क्षेत्रामध्ये तर वाढ झालीच शिवाय जिल्ह्यातील पूर्णा येथेच (Silk Fund) रेशीम कोष खरेदी मार्केट असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. गेल्या वर्षभरात येथील मार्केटमध्ये तब्बल 88 हजार 530 किलो रेशीम कोषाची खरेदी झाली आहे. या माध्यमातून 3 कोटी 26 लाखाची उलाढाल झाली आहे. एवढेच नाही तर मराठवाड्यातील जालना, परभणी आणि आता नव्याने बीडमध्येही रेशीम कोष खरेदी सुरु झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असल्याचे रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले आहे.

कसे असते रेशीम कोषचे मार्केट

गेल्या वर्षभरात परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील खरेदी केंद्रावर 1 हजार शेतकऱ्यांनी 88 हजार 530 किलो रेशीम कोषची विक्री केली आहे. यामाध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे. सध्या 400 ते 450 किलो रेशीम कोषची आवक होत आहे. तर किमान 700 तर कमाल दर हा 800 एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये केलेल्या बदलाप्रमाणे आता मोबदला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे.

असा आहे दुहेरी फायदा

गेल्या काही वर्षांपासूनच मराठवाड्यात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत आहे. शेतकऱ्यांचे परीश्रम आणि सातत्य यामुळे हे शक्य झालेन आहे. शिवाय महारेशीम उद्योग केंद्राच्या माध्यमातून सातत्याने मार्गदर्शन होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. उत्पादनात तर वाढ झालीच आहे शिवाय दरही चांगला मिळत आहे. मराठवाड्यातील परभणी, जालना आणि बीड जिल्ह्यात रेशीम कोष खरेदी केंद्र झाले आहेत. त्यामुळे परराज्यात करावी लागणारी वाहतूक आता टळली आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि येथेच बाजारपेठ मिळाल्याने अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत आहेत.

वाढीव दराची अपेक्षा

सध्या खरेदी केंद्रावर रेशीम कोषची आवक ही सुरु आहे. मात्र, संक्रातीच्या काळात सौदे कमी असल्याने दरात एवढा उठाव झालेला नाही. यातच वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरात घट झाली आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन तर झाले आहे. पण दर कमी असल्याने अनेकांनी साठवणूकीवरच भर दिला आहे. भविष्यात दर वाढणार असल्याचे कृषी तज्ञांचे मत आहे. त्यानुसारच सध्याची आवक सुरु असल्याचे रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

Vegetable: भाजीपाल्याची लागवड केलीय? मग या 4 नियमांचे पालन करा अन् उत्पादन वाढवा

State Government: कृषी क्षेत्रात महिलाराज, राज्य सरकारचा नववर्षात काय आहे पहिला निर्णय?

Corona : कोरोनाचा परिणाम कृषी विद्यापीठांवरही, काय आहेत राज्य शासनाचे आदेश?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI