AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati : राज्यात ऊन-पावासाचा खेळ, पावसामुळे आंबा गळती तर ऊन्हामुळे मोसंबी होरपळली

निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा अनुभव सध्या राज्यात पाहवयास मिळत आहे. अवकाळी पावसामुळे कोकणात आंब्यासह इतर फळपिकांचे नुकसान होत आहे तर याच्या उलट स्थिती विदर्भात आहे. विदर्भामध्ये वाढत्या उन्हाच्या झळामध्ये मोसंबी बागा ह्या होरपळून निघत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. कधी पावसामुळे तर कधी वाढत्या ऊन्हामुळे सध्या तर ऊन-पावसाचा खेळच राज्यात पाहवयास मिळत आहे. अजून तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात अवकाळीच्या सरी बरसणारच आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा पारा हा वाढणारच असल्याचा अंदाज आहे.

Amravati : राज्यात ऊन-पावासाचा खेळ, पावसामुळे आंबा गळती तर ऊन्हामुळे मोसंबी होरपळली
वाढत्या तापमानामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मोसंबी फळगळ होत आहे.Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 11:27 AM
Share

अमरावती : निसर्गाचा लहरीपणा काय असतो? याचा अनुभव सध्या (Maharashtra) राज्यात पाहवयास मिळत आहे. अवकाळी (Rain) पावसामुळे कोकणात आंब्यासह इतर (Fruit crops) फळपिकांचे नुकसान होत आहे तर याच्या उलट स्थिती विदर्भात आहे. विदर्भामध्ये वाढत्या उन्हाच्या झळामध्ये मोसंबी बागा ह्या होरपळून निघत आहे. मात्र, वाढत्या उन्हामुळे आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान हे ठरलेलेच आहे. कधी पावसामुळे तर कधी वाढत्या ऊन्हामुळे सध्या तर ऊन-पावसाचा खेळच राज्यात पाहवयास मिळत आहे. अजून तीन दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात अवकाळीच्या सरी बरसणारच आहे तर विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा पारा हा वाढणारच असल्याचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्याने उष्मघाताचा धोका तर वाढला आहेच पण मोसंबी, संत्र्याच्या बागा होपरपळू लागल्याने उत्पादनात घट होण्याचा धोका आहे.

वाढत्या तापमानाचा फळबागांवर परिणाम काय?

सध्याचा पाऊस आणि वाढते ऊन हे दोन्हीही नुकसानीचेच ठरत आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये मोसंबी आणि संत्र्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, सध्याच्या कडाक्याच्या ऊन्हामध्ये बागांवर तर परिणाम झालाच आहे पण मोसंबी आणि संत्री ही फळे देखील होरपळत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चितच मानली जात असून वाढत्या तापमानामुळे फळ पिकांत वाढ खुंटणे, फळगळ होणे, फळे काळी पडणे यासह छोटी फळे काळवंडत आहेत. मोसंबी झाडांची नाजूक पाने करपून जात आहेत.

मराठवाड्यातील नुकसान टळले

मराठवाड्यात देखील दोन दिवस ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पण पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळलेले आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारीची काढणी सुरु असून अनेकांची मळणी कामे बाकी आहेत. अशातच पावसाने हजेरी लावली तर मात्र, थेट शेतीमालावरच परिणाम होणार होता. पावसामुळे काढलेली ज्वारी ही काळवंडते तर अपेक्षित दरही मिळत नाही. त्यामुळे मध्यंतरीच्या ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांनी निवाऱ्याला ज्वारीसह इतर पिकांची साठवणूक केली आहे.

उत्पादनात होणार घट

शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी एक ना अनेक प्रयत्न केले मात्र, निसर्गाचा लहरीपणाचा कायम अडथळा झाला आहे. यंदा मोसंबी आणि संत्रा फळांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. शिवाय बागा आता अंतिम टप्प्यात असतानाच वाढत्या उन्हामुळे फळांचे तर नुकसान होतेच पण उशिरा आलेला बहराचे देठ नाजूक असल्याने त्याचीही गळती होती. यामुळे उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

संबंधित बातम्या :

Unseasonal Rain : उरली-सुरली आशाही मावळली, हंगामाच्या अंतिम टप्प्यातही अवकाळीची अवकृपा राहिली

Amravati Farmer : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात, ‘असा’ घ्या गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ

Summer Crop : बहरात आलेलं सोयाबीन पदरात पडणार, कृषी विभागाचा सल्ला ऐका अन् संधीच सोनं करा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.