Edible Oil Import : खाद्यतेलांच्या दरात घट, सोयाबीन उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयातीवर भर दिला जात आहे. आयात वाढल्यास दर नियंत्रणात राहून सर्वासामन्यांमध्ये जो रोष आहे तो कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आवक वाढली आहे. वाढत्या आयातीमुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या दरात 50 रुपयांची घट होणार आहे.

Edible Oil Import : खाद्यतेलांच्या दरात घट, सोयाबीन उत्पादकांचा जीव मात्र टांगणीला
खाद्यतेल स्वस्त Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 9:42 AM

औरंगाबाद : (Government) सरकारच्या बदलत्या धोरणाचा कायम परिणाम शेतीमालाच्या दरावर झालेला आहे. शेतीमाल किंवा खाद्यतेलाची आयात निर्यातीमध्ये होत असलेल्या बदलाचे परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाणवत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पामतेलाच्या दरात घट होणार अशी चर्चा होती पण आता प्रत्यक्ष आयात वाढल्याने (Edible Oil) सोयाबीन आणि पामतेल हे स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाची दोन देशातून आयात वाढल्याने तब्बल 50 रुपयांनी तेल स्वस्त होणार आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी ही दिलासा देणारी बाब असली तरी शेतकऱ्यांच्या आणि विशेषत: सोयाबीन उत्पादकांच्या चिंतेत मात्र भर पडणार आहे. कारण (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात कमालीची घट होत आहे. यंदा तर विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाल्याने दराचे चित्र काय राहणार हा देखील मोठा प्रश्न आहे.

खाद्यतेलाची आवक वाढली

सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी खाद्य तेलाच्या आयातीवर भर दिला जात आहे. आयात वाढल्यास दर नियंत्रणात राहून सर्वासामन्यांमध्ये जो रोष आहे तो कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानुसार इंडोनेशिया आणि मलेशियातून पामतेलाची आवक वाढली आहे. वाढत्या आयातीमुळे पामतेल आणि सोयाबीन तेलाच्या दरात 50 रुपयांची घट होणार आहे. या दोन तेलाचा सर्रास वापर वाढत आहे. त्यामुळे आयात वाढवून दरावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय केंद्राने घेतलेला आहे.

सोयाबीनच्या दरात मात्र घट

एकीकडे खाद्यतेलाचे दर घटत असल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळत असला तरी दुसरीकडे मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनला विक्रमी दर मिळे अशी अपेक्षा असताना सोयाबीन हे 6 हजार 100 रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहे. यंदाच्या हंगामात सोयाबीन हे 7 हजार 300 पर्यंत गेले होते. घटत्या उत्पादनामुळे हंगमाच्या अंतिम टप्प्यात दर वाढतील असा अंदाज होता पण आता सरकारच्या धोरणाचा परिणाम सोयाबीन दरावर झालेला आहे.

हे सुद्धा वाचा

प्रक्रिया उद्योगावर गणित अवलंबून

खाद्यतेलाची आयात करुन नागरिकांची गरज भागवावी लागत आहे. जर कच्च्या मालाचे उत्पादन आणि देशातच त्यावर प्रक्रिया करुन तेलाचे उत्पादन उद्योजकांनी घेतले तर त्याचा परिणाम थेट दरावर होणार आहे. देशाअंतर्गतच तेलावर प्रक्रिया झाल्यावर तेलाचे दर हे 100 रुपये किलोपर्यंत येऊ शकतात. त्यामुळे केंद्र सरकारकडून प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात आहे. मात्र, सध्याच्या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा अन् शेतकऱ्यांना फटका असाच काहीसा सरकारचा निर्णय म्हणावा लागेल.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.