AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rabbi Season: वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची अनोखी शक्कल, थेट..

पहिल्या पेऱ्यातील हरभऱ्याची काढणी कामे सुरु झाली आहेत. शिवाय दुसरीकडे वातावरणातील बदलाचे संकेत दिले जात आहेत. म्हणून काढणी झाली लागलीच राशीला सुरवात केली जात आहे. त्यामुळे रखडलेली कामे तर मार्गी लागतच आहेत पण उत्पादन घट होण्याचा धोका टळत आहे.

Rabbi Season: वातावरणातील बदलामुळे पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांची अनोखी शक्कल, थेट..
कृषी विभागाच्यावतीने उत्पादकता जाहीर करण्यात आली असून त्यानुसार आता हरभऱ्याची खरेदी होणार आहे.
| Updated on: Feb 10, 2022 | 1:02 PM
Share

उस्मानाबाद : शेतीमालाच्या उत्पादनापेक्षा आता उत्पादित झालेल्या (Protection Of Agricultural Goods) मालाचे संरक्षण महत्वाचे झाले आहे. कारण गेल्या खरीप हंगामापासून निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांना चांगलाच भोवलेला आहे. सततच्या पावसामुळे राशीची कामेही करणेही मुश्किल झाले होते. त्यामुळे (Production) उत्पादनात तर घट झालीच शिवाय शेतीमालावरही त्याचा विपरीत परिणाम झाला होता. सध्या (Rabbi Season) रब्बी हंगाम जोमात आहे. मात्र, पहिल्या पेऱ्यातील हरभऱ्याची काढणी कामे सुरु झाली आहेत. शिवाय दुसरीकडे वातावरणातील बदलाचे संकेत दिले जात आहेत. म्हणून काढणी झाली लागलीच राशीला सुरवात केली जात आहे. त्यामुळे रखडलेली कामे तर मार्गी लागतच आहेत पण उत्पादन घट होण्याचा धोका टळत आहे. जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे पहिल्या टप्प्यामध्ये पेरण्या झाल्या होत्या. त्या पिकांच्या आता राशी सुरु आहेत.

उत्पादन पदरी पडावे म्हणून शेतकऱ्यांची धडपड

निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील पिकांचे तर नुकसान झालेच होते. पण आता रब्बी हंगामातील पिकांमधून तरी उत्पन्न वाढावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. असे असतानाही रब्बी हंगामातही अवकाळी, गारपिट याचा सामना हा करावाच लागलेला आहे. शिवाय अजून वातावरण बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी आता सावध झाला असून काढणी झाली की, लागलीच पीक राशीला हा एकसुत्री कार्यक्रम राबवला जात आहे. त्यामुले होणारे नुकसान टळणार आहे.

पुन्हा ढगाळ वातारवरण

मध्यंतरीच्या अवकाळी आणि गारपिटनंतर पुन्हा गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे पिकांना तर धोका आहेच पण काढणी झालेल्या पिकांची राशणी झाली नाही तर अधिकचे नुकसान होणार आहे. सकाळी गारठा आणि दिवसभर ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातही चिंतेचे ढग हे कायम आहेत. यातच पुन्हा हवामान विभागाने वातावरण बदलाचे संकेत दिले आहेत. म्हणून शेतकरी सतर्क झाला आहे.

बाजारपेठेपेक्षा हमीभाव केंद्रावरच भर

तुरीप्रमाणेच हरभऱ्यासाठीही हमीभाव केंद्र उभारण्यात आली आहेत. शिवाय बाजारपेठेतले दर आणि हमीभाव यामध्ये जवळपास 700 रुपायांचा फरक येत असल्याने शेतकरी हे हमीभाव केंद्राचाच आधार घेत आहेत. त्यामुळे बाजारपेठमध्ये 2 ते 3 हजार क्विंटलचीच आवक सुरु आहे. हरभऱ्यासाठी शासनाचा हमीभाव हा 5 हजार 230 एवढा आहे. त्यामुळे नोंदणी आणि हमीभाव केंद्रावरच विक्री हाच पर्याय शेतकरी निवडत आहे.

संबंधित बातम्या :

Photo Gallery: केळी बागांवर विघ्न कायम, बागा अंतिम टप्प्यात असतानाही कशाचा धोका?

Mango Rate : बाजारात उशिरा एंन्ट्री तरीही ‘राजा’चा रुबाब कायम, हापूसला कोल्हापुरात विक्रमी दर

पेरले ते उगवले मात्र, पदरात नाही पडले, मुख्य आगारात हळदीचा रंग झाला फिक्कट, कशामुळे निर्माण झाली परस्थिती?

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.