इलेक्ट्रीक ट्रॅक्टर आला बाजारात, एकदा चार्ज केला की इतके तास चालणार
डिझेल ट्रॅक्टरला टक्कर देण्यासाठी ई-ट्रॅक्टर बाजारात आला आहे. हा ट्रॅक्टर शेतीच्या कामात मोठी क्रांती आणणार आहे. चला पाहूयात या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूयात..

Electric Tarctor: कृषी तंत्रज्ञानात आता मोठी क्रांती होणार आहे. डिझेलच्या वाढत्या किंमती आणि देखभाल खर्च यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. CSIR च्या संशोधकांनी आता एक असा इलेक्ट्रीक ट्रॅक्टर तयार केला आहे जो केवळ स्वस्तच नसेल पर्यावरण अनुकूल देखील असणार आहे. येत्या काही दिवसात हा इलेक्ट्रीक ट्रॅक्टर शेतीच्या कामात मोठी क्रांती आणणार असून महिला देखील याला सहज चालवू शकणार आहेत.
पाच तास काम करणार, खर्च केवळ २०० रुपये
CSIR चे मुख्य संशोधक डॉ. प्रदीप राजन यांनी सांगितले की हा ई-ट्रॅक्टर शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यास पुरुष आणि महिला दोन्ही सहज चालवू शकतात. डिझेल ट्रॅक्टर चालवतान ज्या अडचणी असतात त्या यात नाहीत. हा सहजपणे चालतो. त्यामुळे थकायला होत नाही. तसेच याचा मेन्टेनन्सचा खर्च देखील कमी आहे. या ट्रॅक्टरला चार्ज करण्यासाठी चार तास लागतात. त्यानंतर तुम्ही ४ ते ५ तास शेतातील कामे करु शकता. सामान्य डिझेल ट्रॅक्टरला एका तासाला सुमारे १.५ लिटर डिझेल लागते.तेथे या ट्रॅक्टरला पाच तासांसाठी केवळ १८ ते २० युनिट वीज लागते. त्यामुळे शेतकऱ्यांची ६४ टक्के बचत होते.
२६ एचपीची ताकद आणि पाच वर्षांहून अधिक चालणारी बॅटरी
या ई-ट्रॅक्टरची २६ हॉर्सपावर क्षमता आहे, दोन बैल मिळून १ एचपी ताकद देतात. अशात हा २६ एचपीवाला ट्रॅक्टर खूपच ताकदवान आहे.याच्या सोबत नांगर, रोटावेअर सारखे सर्वच उपकरणे आरामात लावू शकतो. याच्या बॅटरीची गॅरंटी पाच वर्षांची आहे. यास दहा हजार वेळा चार्ज-डिस्चार्ज करु शकता. शेती शिवाय ट्रान्सपोर्टसाठी शेतकरी याचा उपयोग करु शकतात. हा लागोपाठ सहा तास सामान वाहून नेऊ शकतो.
हा ट्रक्टर तयार करण्याची योजना साल २०२० मध्ये सुरु झाली होती. डिसेंबर २०२३मध्ये हे मॉडेल तयार झाले. याला तयार करण्यासाठी तीन वर्षांचा काळ लागला. या ट्रॅक्टरची उत्पादन खर्च ८.५ लाख रुपये आहे. परंतू शेतकऱ्यांसाठी सबसिडी मिळत आहे. केंद्र सरकारला यासाठी सबसिडी देण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना हा ट्रॅक्टर अवघ्या ४ ते ४.५ लाखात मिळू शकतो अशी माहिती CSIR चे प्रिन्सिपल संशोधक अविनाश कुमार यादव यांनी सांगितले.
