Crop Insurance : पीकविमा योजनेतील बदल शेतकऱ्यांनी स्विकारला, यंदाच्या खरिपात 92 लाख शेतकऱ्यांचा सहभाग

यंदा खरीप हंगामातील 54 लाख 34 हजार हेक्टरावरील क्षेत्रावर संरक्षण कवच राहणार आहे. राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांनी ह्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. योजनेतील बदलाचा स्विकार शेतकऱ्यांनी केला असून यंदा अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा मोबदला मिळणार आहे. यंदा राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे 7 लाख 97 हजार 135 शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.

Crop Insurance : पीकविमा योजनेतील बदल शेतकऱ्यांनी स्विकारला, यंदाच्या खरिपात 92 लाख शेतकऱ्यांचा सहभाग
पीकविमा योजना
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 4:04 PM

पुणे : निसर्गाच्या लहरीपणामुळे (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले तर किमान आर्थिक मदतीचा हातभार मिळावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या (Crop Insurance) पंतप्रधान पीकविमा योजनेचा खऱ्या अर्थाने उपयोग यंदाच्या (Kharif Season) खरिपात झालेला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच लागून राहिलेला पाऊस आणि योजनेचे बदललेले स्वरुप यामुळे राज्यातील तब्बल 92 लाख शेतकऱ्यांनी योजनेत सहभार नोंदवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 लाख शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. तर विमा योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 54 लाख 34 हजार 552 हेक्टराचे क्षेत्र संरक्षित झाले आहे. खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा सर्वाधिक क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे विमाही सोयाबीनचाच अधिक उरवण्यात आला आहे. प्रिमीअम रक्कम ही सर्वाधिक असताना देखील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचाच अधिक विमा काढला आहे.

20 जिल्ह्यांमध्ये घटला सहभाग

पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढला असला तरी वीस जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. उर्वरित जिल्ह्यातूनच शेतकऱ्यांची सहभाग होण्याची संख्या ही वाढली आहे. तर दुसरीकडे ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, वर्धा, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातून शेतकऱ्यांची संख्या घटली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा योजनेतील सहभाग वाढलेला आहे.

54 लाख 34 हजार हेक्टरावरील क्षेत्र संऱक्षित

यंदा खरीप हंगामातील 54 लाख 34 हजार हेक्टरावरील क्षेत्रावर संरक्षण कवच राहणार आहे. राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांनी ह्या योजनेत सहभाग नोंदवला आहे. योजनेतील बदलाचा स्विकार शेतकऱ्यांनी केला असून यंदा अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याचा अधिकचा मोबदला मिळणार आहे. यंदा राज्य सरकारने केलेल्या बदलामुळे 7 लाख 97 हजार 135 शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. त्यामुळे वाढलेला सहभाग आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला किती हे पहावे लागणार आहे.

योजनेचे बदलले स्वरुप

बीड पॅटर्नमध्ये विमा हप्त्याचे दायित्व हे 80:110 असे असणार आहे.विमा कंपनीला द्यावी लागणारी नुकसान भरपाई 110 टक्के पेक्षा अधिक असेल तर वरची रक्कम राज्य सरकार देईल आणि सदर नुकसान भरपाई ही 80 टक्के पेक्षा कमी असेल तर कंपनीला खर्चापोटी 20 टक्के रक्कम देऊन उर्वरित रक्कम राज्य सरकार घेणार आहे. असे स्वरुप असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान टळणार आहे. योजनेचे स्वरुप बदलल्यामुळे देखील शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.