AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वेळ अमावस्या, शहरांमध्ये शुकशुकाट-शेत शिवार गजबजणार

वेळ अमवस्या म्हणलं की शेतकऱ्यांसाठी काळ्या आईच्या पुजेचा सण या सणाला ग्रामीण भागात मोलाचे स्थान आहे. वेळ अमावस्या म्हणल की लहान, महिला, पुरुष सर्वासाठी एकत्र येऊन शेतशिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस असतो. गेल्या दोन वर्षापासून या सणावर कोरोनाचे सावट होते.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची वेळ अमावस्या, शहरांमध्ये शुकशुकाट-शेत शिवार गजबजणार
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 9:15 AM
Share

लातूर : वेळ अमवस्या म्हणलं की शेतकऱ्यांसाठी काळ्या आईच्या पुजेचा सण या सणाला ग्रामीण भागात मोलाचे स्थान आहे. वेळ अमावस्या म्हणल की लहान, महिला, पुरुष सर्वासाठी एकत्र येऊन (Farm) शेतशिवारात जाऊन आनंदात पांडवांची पूजा करून साजरा करण्याचा दिवस असतो. गेल्या दोन वर्षापासून या सणावर कोरोनाचे सावट होते. यंदा अद्यापही जिल्हा प्रशासनाने कोणतेही निर्बंध लादल्यामुळे दोन वर्षानंतर का होईना मोठ्या उत्सहात हा सण पार पाडला जाणार आहे. (Marathwada) मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये हा सण रुढी-परंपरा कायम ठेवत पार पडत आहे. त्यामुळे आज शहरात कमालीचा शुकशुकाट असणार तर शेत शिवारात नागरिकांची गर्दी आणि बच्चे कंपनीचा किलबिलाट राहणार आहे.

नेमके काय असते दिवसभर

शेतातील उत्पन्नाची सम्रद्धी भरमसाठ होण्याची मनोकामना व्हावी म्हणून मनोभावे काळ्या आईची पूजा असंख्य शेतकरी करतात. गत दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण असल्याने शेतशिवार हिरवेगार झाल्याचे दिसून येत आहे. आमवस्येनिमित्त खाण्याची जणू मेजवानीच असते. आंबील, गव्हाची खीर, भज्जी, अंडे, धपाटे, शेंगा चटणी, वरण अशा विविध प्रकारचा मेनू असतो. त्यामुळे एरव्ही शेतीकडे बगल देणारी माणसे सगळीकडे हिरवेगार बागायत असल्याने शेतीची वारी करू लागले आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, परळी भागातील शेतकऱ्यांनी जोपासली आहे.

नैसर्गिक संकटानंतरही शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम

यंदा खरीप हंगामात शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर झालेल्या पावसामुळे किमान रब्बी हंगामात झालेले नुकसान भरुन काढण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला होता.मात्र, पुन्हा अवकाळीचे संकट कायम आहे. आता रब्बी हंगामातील पीके बहरात आहेत. पण नैसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम उत्पादन वाढीवर होणार का हा सवाल कायम आहे. असे असले तरी शेतकऱ्यांचा उत्साह हा कायम आहे. आज होणाऱ्या या वेळ अमावस्या ही परंपरा जोपासतच पार पडणार असल्याचे शेतकरी सचिन रोडगे यांनी सांगितले आहे.

काळजी घेण्याचे आवाहन

वेळ अमावस्याच्या अनुशंगाने लातूर जिल्ह्यात दरवर्षी शासकीय सुट्टी दिली जाते. पण यंदा रविवारीच हा सण आला आहे. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना हा एक सण आहे. त्यामुळे कोणतेही निर्बंध लादण्यात आलेले नाहीत पण 50 पेक्षा अधिक नागरिकांनी एकत्र येऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

Kharif Season : खरिपातील या दोन पिकांच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण..!

PM KISAN : 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, अशी करा आपल्या नावाची तपासणी !

PM Kisan : कशामुळे सुरु झाली योजना? रक्कम जमा होत असतानाच पंतप्रधान मोदींनी सांगितले कारण!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.