लॉकडाऊन वाढल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, शेकडो क्विंटल टरबूज शेतातच सडण्याची वेळ

टरबूज विक्रीसाठी तयार झाले आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. | Farmers Lockdown

लॉकडाऊन वाढल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, शेकडो क्विंटल टरबूज शेतातच सडण्याची वेळ

वाशिम: झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे वाशिम जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दवाखाने, मेडिकल वगळता सर्वकाही बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. शेतकऱ्यांना (Farmers) याचा मोठा फटका बसत आहे. रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील अमोल सदार यांच्या शेतातील काढणीला आलेले दीड एकरातील टरबूज शेतातच सडण्याची वेळ आली आहे.यासाठी 70 हजार रुपये लागवड खर्च आला असून तोही वसूल होत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (Farmers facing problems due to coronavirus lockdown restrictions)

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील अमोल सदार यांनी दीड एकरवर टरबुजाची लागवड केली. टरबूज विक्रीसाठी तयार झाले आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले.त्यामुळं जिल्ह्यातील बाजारपेठा बंद झाल्याने शेकडो क्विंटल टरबूज शेतातच सडत आहेत. त्यामुळे लागवड खर्चही वसूल होत नसल्याने खरिपातील पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला काहीतरी मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.

वर्ध्यात संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात रचला फळांचा ढीग

वर्धा जिल्ह्यात ८ मे ते १३ मे च्या सकाळपर्यंत कडक लॉकडाउन लावण्यात आले होते.मात्र यात बुधवारी आणखी पाच दिवसांचा वाढ करण्यात आलीय.लॉकडाऊनमध्ये वाढ केल्याच्या निषेधार्थ प्रहारच्या बाळा जगताप यांच्या सोबत शेतकऱ्याने संतप्त होत तहसील कार्यालयात फळे आणून टाकली. तहसील कार्यालयात विविध फळांचा ढीगच रचला.

प्रशासनातर्फे कसलेही नियोजन नसून वारंवार लावण्यात येणाऱ्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील फळे, भाजीपाला शेतातच सडत आहे. शेतकऱ्यांना न सहन होणारा आर्थिक फटका बसत असल्याने प्रचंड संताप असल्याचे प्रहार संघटनेच्या बाळा जगताप यांनी सांगितले.

खरीप हंगामासाठी बियाणे, खत कधी मिळणार ?

राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस सुरु झाला असून शेतकऱ्यांनी पेरणीसाठी तयारी सुरु केली आहे. शेतकरी बियाणे, खते ( seed and fertilizer) यांची जोजवणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी मुदतीच्या पाच दिवस आधीच शेतकऱ्यांना बियाणे आणि खते मिळणार आहेत. यावर्षी येत्या 30 मे रोजी बियाणांची विक्री होणार होती. मात्र, आता हीच विक्री पाच दिवस आधी म्हणजेच 25 मे पासून सुरु होणार आहे.

पुरेशा पावसानंतर पेरणी करा

मागील काही वर्षांपासून पावसाचे चक्र बदलले आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करुन पावसाने कित्येक दिवस दडी मारल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याच कारणामुळे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे या वर्षी बियाणे लवकर खरेदी केले तरी पुरेशा पावसानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असे राज्य सरकारने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात सध्या कोरोनाविषयक निर्बंध असल्यामुळे कृषीविषयक दुकाने उघडण्यासाठी काही निर्बंध आहेत. त्यामुळे याच गोष्टीचा विचार करुन राज्य सरकारने राज्यातील कृषी दुकाने 10 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील असे सांगितले आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी योग्य वेळ मिळेल असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या:

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग; जाणून घ्या बियाणे, खत कधी मिळणार ? राज्य सरकारने दिली माहिती

पहिल्या लॉकडाऊनमधील नुकसान भरुन काढण्यासाठी जिद्दीनं राबला, दुसऱ्या लाटेनं युवा शेतकऱ्याच्या कष्टावर पाणी फेरलं

खाद्यतेलापाठोपाठ फळे आणि भाज्यांचे भावही गगनाला भिडले

(Farmers facing problems due to coronavirus lockdown restrictions)