Agricultural : शेततळ्यासाठी 75 हजाराचे अनुदान, महाविकास आघाडी सरकारनेच अनुदनावर केला शिक्कामोर्तब

शेततळ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. शिवाय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलचा वापर सहज शक्य असला तरी अद्यापपर्यंत याबाबत मार्गदर्शक सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ही सोडतद्वारे केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचे अर्ज एकत्र करुन त्याची सोडत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ असे त्याचे स्वरुप असणार आहे.

Agricultural : शेततळ्यासाठी 75 हजाराचे अनुदान, महाविकास आघाडी सरकारनेच अनुदनावर केला शिक्कामोर्तब
शेततळे
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 1:51 PM

मुंबई : यंदाच्या (Budget) अर्थसंकल्पामध्ये शेततळ्यासाठी वाढीव अनुदान देण्याची घोषणा झाली होती मात्र, प्रत्यक्ष निर्णय झाला नव्हता. अंतिम आदेश हे गेल्या तीन महिन्यापासून रखडले होते पण सरकार बदल्यापूर्वीच (MVA) महाविकास आघाडी सरकारने या संदर्भातला आदेश जारी केला शिवाय शेततळ्यासाठी वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यास 75 हजारापर्यंत अनुदान मिळणार असून या रकमेच्या मदतीने (Farm Ponds) शेततळे उभारता येणार आहे. मागेल त्याला शेततळे ही योजना बंद झाल्यानंतर शेततळ्यासंदर्भात मोठा निर्णय झाला आहे. अनुदान वाटपात महाडिबीटी चा वापर केला जाणार असून यासंर्भातील माहिती शेतकऱ्यांना तालुका कृषी कार्यालयातून घ्यावी लागणार आहे.

सोडतद्वारे होणार शेतकऱ्यांची निवड

शेततळ्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. शिवाय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी महाडिबीटी पोर्टलचा वापर सहज शक्य असला तरी अद्यापपर्यंत याबाबत मार्गदर्शक सुचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड ही सोडतद्वारे केली जाणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांचे अर्ज एकत्र करुन त्याची सोडत आणि त्यानुसार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ असे त्याचे स्वरुप असणार आहे.

असे असणार शेततळ्याचे स्वरुप

शेततळ्याच्या आकारानुसार शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. यामध्ये मात्र, 30 मीटर बाय 25 मीटरासाठी 75 हजार आणि 30 बाय 30 मीटरसाठीही 75 हजार रुपयेच अनुदान असणार आहे. त्यामुळे शेततळ्याची साईज ठरवण्याचा अधिकार हा शेतकऱ्यांनाच असणार आहे. यापुर्वी अनुदानाची रक्कम ही 50 हजार एवढी होती. शेततळ्यामुळे नगदी पिकांच्या उत्पादनात वाढ झाल्याचे समोर आल्याने शेततळ्यांची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने अनुदानात वाढ कऱण्यात आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे.

हे सुद्धा वाचा

अर्ज व आवश्यक कागदपत्रे

ज्या शेतकरी समूहाला अर्ज करायचा आहे त्यांनी https//hortnet.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. यामध्ये 7/12, 8 अ, आधार कार्ड, आधार संलग्न राष्ट्रीयीकृत बैंक खाते पासबूक च्या प्रथम पानाची झेरॅाक्स, विहित नमुन्यातील हमिपत्र, संवर्ग प्रमाणपत्र ऑनलाईन नोंदणी करतानाच ही कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तरच पुढची प्रक्रिया लवकर पार पडणार आहे.

Non Stop LIVE Update
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.