Eknath Shinde : अतिवृष्टीने राज्यात 15 लाख हेक्टराचे नुकसान, नियम बाजूला सारून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा दुप्पट मदत

अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम आता खरीप हंगामावर झाला हे स्पष्ट आहे. नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांनीही केली होती. त्यानुसार राज्य सरकारने एनडीआरएफ च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ केली तर नुकसानीचे क्षेत्र हे 3 हेक्टरपर्यंत केले आहे. यापूर्वी केवळ 2 हेक्टरावरील नुकसानीसाठी ही मदत केली जात होती.

Eknath Shinde : अतिवृष्टीने राज्यात 15 लाख हेक्टराचे नुकसान, नियम बाजूला सारून शेतकऱ्यांना अपेक्षेपेक्षा दुप्पट मदत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भूषण पाटील

| Edited By: राजेंद्र खराडे

Aug 13, 2022 | 6:39 PM

कोल्हापूर : राज्यात (Heavy Rain) अतिवृष्टीने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात मराठावाडा आणि विदर्भात पावसाने उसंत घेतली असली तरी सांगली अन् कोल्हापुरात पावसाचे थैमान सुरु आहे. त्यामुळे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली आहे. राज्यात आतापर्यंत 15 लाख हेक्टरावरील (Crop Damage) पिकांचे नुकसान झाले आहे. यामधून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीचे निकष न पाहता शेतकऱ्यांच्या हिताचा शिवसेना आणि भाजप युती सरकारने विचार केला आहे. त्यानुसारच हेक्टरी जी मदत 6 हजार 800 होती ती आता 13 हजार 600 करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर ते कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी कोल्हापुरात सातत्याने निर्माण होणाऱ्या पूरस्थितीवरही कायमचा तोडगा काढला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी भरीव मदत

अतिवृष्टी आणि सततच्या पावसाचा परिणाम आता खरीप हंगामावर झाला हे स्पष्ट आहे. नुकसानीची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी अशी मागणी विरोधक आणि शेतकऱ्यांनीही केली होती. त्यानुसार राज्य सरकारने एनडीआरएफ च्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या रकमेत दुपटीने वाढ केली तर नुकसानीचे क्षेत्र हे 3 हेक्टरपर्यंत केले आहे. यापूर्वी केवळ 2 हेक्टरावरील नुकसानीसाठी ही मदत केली जात होती. यामध्ये वाढ केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पिकांचेच नाही तर घरांचीही पडझड

पावसाने केवळ शेतकऱ्यांची पिकेच हिरावली असे नाही तर अनेकांचे संसारही उघड्यावर आले आहेत. घरांची पडझड झाली आहे. त्यांच्यासाठीही मदत निधीची तरतूद केली जाणार आहे. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि आता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पिकांचे नुकसान झाले आहे. वेळप्रसंगी नियमावलीत बदल केला जाईल पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

नागपूर विभागात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत

नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळत आहे. एका शेतकऱ्याचे एका हेक्टर पेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना 408, 544, 612 रुपये अशी मदत दाखवण्यात आली आहे. मुळात 1 हजार रुपयांपेक्षा कमी मदत करू नये असे सरकारचे आदेश आहे. मात्र, तरीही त्याखाली मदत दाखविण्यात आलीय. त्यामुळं ही म्हणजे आमची थट्टा आहे, मदत नको पण थट्टा करू नका, अशा भावना शेतकरी व्यक्त करताहेत.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें