VIDEO ! हातचं खरिप गेलं, जगावं कस? नांदेडच्या राऊबाईंचा भाविनक व्हिडीओ व्हायरल

पावसाने केवळ पिकाचेच नाहीतर जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील पोखर्णीच्या शिवारातील सोयाबीन तर वाहून गेलेच आहे. पण जमिनही खरडून गेली आहे. शेतामधले हे नुकसान पाहताच राऊबाई या महिलेस अश्रु अनावर झाले आणि या वयोवृध्द महिलेने एकच प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे जगायचं कसं?

VIDEO ! हातचं खरिप गेलं, जगावं कस? नांदेडच्या राऊबाईंचा भाविनक व्हिडीओ व्हायरल
शेताची अवस्था पाहून अश्रु अनावर झालेल्या रा्ऊबाई चाटे या महिला शेतकरी


नांदेड : खरिप हंगाम अंतिम टप्प्यात असताना पावसाची अशी काय अवकृपा झाली आहे की, शेतकऱ्याला जगावं कसं ? असा प्रश्न पडलाय. पावसाने केवळ पिकाचेच नाहीतर जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. नांदेड जिल्ह्यातील पोखर्णीच्या शिवारातील सोयाबीन तर वाहून गेलेच आहे. पण जमिनही खरडून गेली आहे. शेतामधले हे नुकसान पाहताच राऊबाई या महिलेस अश्रु अनावर झाले आणि या वयोवृध्द महिलेने एकच प्रश्न उपस्थित केला तो म्हणजे जगायचं कसं?

कंधार तालुक्यातील राऊबाई ह्या पतीला आणि विधवा सुनेला हाताशी घेऊन शेती करतात. दरवर्षीप्रमाणे खरिपात त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. पेरणीपासूनच मशागत आणि फवारणीवर त्यांनी भर दिला होता. वेळप्रसंगी हात ऊसने पैसे घेऊन त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सोयाबीनची जोपासना केली. सर्व काही सुरळीत असताना चार दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे पेठवड येथील मध्यम प्रकल्पाची जीर्ण झालेली भींत फुटली आणि सर्व पाणी पोखर्णी शिवारात शिरले. पाण्याचा प्रवाह एवढा होता की, पिकासह या शिवारातील तब्बल 30 हेक्टर शेत जमिनही खरडून गेली. यामध्ये राऊबाई चाटे यांचे सोयाबीन तर मातीमोल झालेच आहे. शिवाय शेत जमिनच खरडून गेल्याने आता जगायचे कसे असा सवाल राऊबाई यांनी उपस्थित केला आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर राऊबाई या शेतावर आल्या आणि शेतीची झालेली अवस्था पाहुन त्यांना रडू कोसळले आहे. त्यांनी मदतीच्या अनुशंगाने सरकारला साद घातलेली आहे. राऊबाई यांच्यावरच कुटूंबाची मदार आहे. घरातील कर्ता असलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याने सर्व जबाबदारी ही राऊबाई यांच्यावर आहे. त्यामुळे सरकारने याची दखल घेऊन त्वरीत मदत करण्याची मागणी राऊबाई यांच्यातारख्या अनेकांवर आलेली आहे. how-to-live-due-to-crop-damage-farmers-question

खरीप पिकावरच शेतकऱ्याची मदार

मराठवाड्यात खरिप आणि रब्बी या दोन हंगामात उत्पादन हे घेतले जाते. यामधील खरिपातील सोयाबीनवरच शेतकऱ्यांची खरी मदार आहे. मात्र, दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. अधिकच्या उत्पादनाच्या दृष्टीने सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. मात्र, ऐन काढणीच्या प्रसंगीच पावसाने पिकाचे नुकसान होतेय

नेमकं काय आहे व्हिडीओमध्ये

खरिपात पेरलेलं सगळं वाया गेलयं..काय खावं आणि कसं जगावं..शेतावरच पोट होतं..आता म्हतारं-म्हतारी आम्ही काय खावं..केलं तेवढं सर्व वाया गेलंय..त्यामुळं सरकारनं नुकसाहभरपाई द्यावी अशी भावनिक साद राऊबाई ह्या सरकारला घालत आहेत.

नुकसान भरपाईवरच शेतकऱ्यांची मदार

एकरी 30 हजार रुपये खर्ची करून शेतकऱ्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे पिकांची जोपासना केली होती. एवढेच नाही तर मशागतीसाठीही हजारो रुपये खर्ची केले. मात्र, अतिवृष्टीने सर्वकाही मातीमोल झाले आहे. केवळ पिकंच नाही तर शेत जमिनही खरडून गेल्यानं शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झालं आहे.

इतर बातम्या :

Video : बसच्या चाकाखाली येऊनही दुचाकीस्वार वाचला, काळजाचा ठोका चुकवणारा अपघात

नरेंद्र मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, 26058 कोटींच्या योजनेला मंजुरी, लाखो नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता

IPL 2021 : डिव्हिलियर्सचा धमाका, सराव सामन्यात वादळी शतक, RCB ने रणशिंग फुंकलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI