AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेळेचे बचत अन् अधिकची भेंडी तोडणी करणारी सुधारित कात्री

भेंडीची काढणी करतानाही महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. भेंडीच्या देठावर एकप्रकारची लव असते. त्यामुळे भेंडी सहजरित्या काढता येत नाही. मात्र, राहुरी येथील माहत्मा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र व अवजारे विभागामार्फत सुधारित कात्रीची निर्मती करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी सहजरित्या भेंडी काढणीचे काम सुलभरित्या होते.

वेळेचे बचत अन् अधिकची भेंडी तोडणी करणारी सुधारित कात्री
भेंडी तोडणीसाठी अद्यावत कात्री
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 2:48 PM
Share

अहमदनगर : दिवसेंदिवस शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांचा प्रश्न अधिकच बिकट होत आहे. मजुराअभावी अनेक कामेही रखडली जातात. भाजीपाला तोडण्याचे काम तसे महिंलाकडेच असते. याकरिता योग्य साधनं नसल्याने अडचणी ह्या वाढत आहेत. भेंडीची काढणी करतानाही महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. भेंडीच्या देठावर एकप्रकारची लव असते. त्यामुळे भेंडी सहजरित्या काढता येत नाही. मात्र, राहुरी येथील माहत्मा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र व अवजारे विभागामार्फत सुधारित कात्रीची निर्मती करण्यात आली आहे. त्यामुळे अगदी सहजरित्या भेंडी काढणीचे काम सुलभरित्या होते.

मुख्य पिकाला पर्याय म्हणून शेतकरी आता कमी कालावधीत अधिकचे ऊत्पन्न घेण्याच्या दृष्टीने भाजीपाल्याकडे वळत आहे. मात्र, कधी निसर्गाच्या लहरीपणामुळे तर कधी वेळेत मजुर न मिळाल्याने वेळेत माल हा बाजारात दाखल होत नाही. परिणामी मार्केट असुनही शेतकऱ्यांच्या पदरी मोबदला पडत नाही. मजुर मिळाले तरी भेंडीची काढणी करताना तळ हाताला आणि बोटाला इजा होतात. याचाच अभ्यास करून राहुरी येथील माहत्मा कृषी विद्यापीठातील कृषी यंत्र व अवजारे विभागामार्फत एक अद्यावत अशी कात्री तयार करण्यात आली आहे.

मजुरांना अगदी सहजरित्या त्याचा वापर करता यावा अशी ही कात्री विद्यापीठाने बाजारात उपलब्ध केलेली आहे. यामध्ये धार तर आहेच शिवाय स्प्रिंगचा वापर केल्याने कापण्यात कष्टही कमी पडतात. शिवाय हलक्या हाताने भेंडीची छाटणी करता येते. या साधनामुळे दिवसाकाठी एक मजुर 50 ते 60 किलो भेंडीची काढणी करु शकतो. दोन्ही हाताचा वापर करूनही काढणी ही करता येते. यामुळे भेंडी काढणीचा खर्चही कमी होतो आणि वेळेत हा माल बाजारात दाखल करणे शक्य होते. अवजार म्हणून कात्री हे छोटे साधन असले तरी उपयोगाचे आहे. शिवाय सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा 100 रुपयांमध्येच ही कात्री बाजारपेठेत उपलब्ध आहे.

काय आहेत सुधारित कात्रीचे फायदे

आजही शेतकरी भाजीपाल्याची तोडणी ही हातानेच करतो. यामुळे वेळ तर खर्ची होतोच शिवाय मजुराला किंवा शेतकऱ्यास इजा होण्याचा धोका असतो. त्यामुळे ही सुधारीत कात्री अगदी सहज हाताळता येते. महिला मजुर दिवसाकाठी 60 किलोही भेंडीची काढणी करु शकतात. या कात्रीमुळे वेळेची बचत होते शिवाय कष्टही कमी पडते.

कमी मजुरात अधिकचे काम

शेताकामासाठी मजूर मिळत नाहीत. शिवाय भेंडी काढणे तसे किचकट काम. या सुधारीत कात्रीमुळे वेळेचीही बचत होते. कात्री दोन्ही हाताच्या साह्याने भेंडीची तोडणी करता येत असल्याने कमी वेळेत अधिकचा माल छाटला जातो. ही सुधारीत कात्री बाजारात उपलब्ध असून केवळ 100 रुपये किमंत असल्याचे कृषी महाविद्यालयातील प्रा. अमोल खडके यांनी सांगितले आहे. (Time saving due to improved okra harvesting)

इतर बातम्या :

डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात दोषारोप निश्चित, खटला चालवला जाणार

ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नसेल तर पदावर राहून उपयोग काय?; बबनराव तायवाडे यांचे राजीनामा देण्याचे संकेत

किरीट सोमय्यांकडे ईडीचं प्रवक्तेपद द्या; रोहित पवारांचा जोरदार टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.