AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update: पुढे पाच दिवस अख्खा देश, ठंडा ठंडा कुल कुल ! हवामान विभागाचं भाकित

भारतीय हवामान विभागानं देशात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट नसेल, अशी माहिती दिली आहे. IMD Predicted No heatwave

Weather Update: पुढे पाच दिवस अख्खा देश, ठंडा ठंडा कुल कुल ! हवामान विभागाचं भाकित
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 8:04 PM
Share

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागानं देशात पुढील पाच दिवसात उष्णतेची लाट नसेल, अशी माहिती दिली आहे. भारतीय हवामान विभागाच्या या अंदाजाबाबत एएनआय या वृत्तसंस्थेंनं ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात पावसानं ठिकठिकाणी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. (IMD Predicted No heatwave conditions are expected over the country during the next 5 days )

भारतीय हवामान विभागाचं ट्विट

अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. दुपारपासून वातावरणात बदल होऊन पाऊस आल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली.

वर्धा जिल्ह्यात पावसाची हजेरी

वर्धा जिल्ह्यातील देवळी आणि आर्वी तालुक्याच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. देवळी तालुक्यातील पुलगाव , दहेगाव , नाचणगाव , कवठा , कुरझडी आणि आर्वी तालुक्याच्या रासुलाबाद , सोरटा , विरुळ परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अर्ध्या तासपासून जास्त वेळ पावसाची जोरदार बॅटिंग सुरु होतीय. मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतीकामांना वेग येणार आहे.

औरंगाबादमध्येही पाऊस

औरंगाबादेत आज पुन्हा धुवांधार पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून रोज धुवांधार पाऊस कोसळतोय. औरंगाबाद शहरात गेल्या अर्धा तासाहून अधिक वेळ मुसळधार पाऊस झाला. औरंगाबाद शहरासह जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

बुलडाणा जिल्ह्यात मान्सून जोरदार बरसला असून जिल्ह्यात ठिकठिकाणी आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. चिखली मध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केलीय..।यामुळे शेतकरी आनंदित झाला असून खरीप पूर्व मशागतीची कामे आता सुरू होणार आहे. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यत ढगाळ वातावरण होते. मात्र काही भागात पाऊस झाला होता, तर काही भागात पाऊस झाला नव्हता, मात्र आज चिखली तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय, जिल्ह्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत होता, मात्र आज झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला असून खरीपपूर्व कामाला आता वेग मिळणार आहे.

संबंधित बातम्या:

Weather Update: महाराष्ट्रात आजही पावसाची दमदार बॅटिंग? हवामान विभागानं काय सांगितलं?

मान्सूनची महाराष्ट्राकडे वेगाने कूच, 2-3 दिवसात महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता

(IMD Predicted No heatwave conditions are expected over the country during the next 5 days )

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.