AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cultivation of Agriculture: रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात, भर उन्हाळ्यातील शेती मशागतीचे फायदे काय?

यंदा रब्बी हंगाम महिनाभराने लांबणीवर पडलेला आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी पेरणीला उशिर झाला असून त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रब्बी हंगाम उरकताच शेतकरी आता शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरण, मोगडणी, कुळपणी, रोटरणे यासारखी मशागतीची कामे केली जातात तर पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतजमिनीमध्ये गाळ टाकणे, सुपिकता वाढवणे अशी कामे करुन घेतली जाता. शिवाय उन्हाळ्यात ही कामे करुन घेण्याचे एक ना अनेक फायदे होत आहेत.

Cultivation of Agriculture: रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात, भर उन्हाळ्यातील शेती मशागतीचे फायदे काय?
इंधन दरावाढीमुळे पुन्हा बैलजोडीने शेती मशागतीची होऊ लागली आहेत.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 02, 2022 | 6:32 PM
Share

नांदेड : यंदा (Rabi Season) रब्बी हंगाम महिनाभराने लांबणीवर पडलेला आहे. अधिकच्या पावसामुळे रब्बी पेरणीला उशिर झाला असून त्याचा हा परिणाम आहे. त्यामुळे रब्बी हंगाम उरकताच शेतकरी आता (Agricultural Cultivation) शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. दरवर्षी उन्हाळ्यामध्ये नांगरण, मोगडणी, कुळपणी, रोटरणे यासारखी मशागतीची कामे केली जातात तर पावसाला सुरवात होण्यापूर्वीच शेतजमिनीमध्ये गाळ टाकणे, सुपिकता वाढवणे अशी कामे करुन घेतली जाता. शिवाय (Summer Work) उन्हाळ्यात ही कामे करुन घेण्याचे एक ना अनेक फायदे होत आहेत. काळाच्या ओघात मशागतीमध्ये यंत्राचा वापर वाढला असला तरी आजही शेतकरी बैलजोडीच्या सहायाने ही कामे उरकून घेत आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पीक कापणी झाल्यानंतर भर उन्हामध्ये मशागतीचे कामे केली जात आहेत.

उन्हाळ्यातील शेतीमशागतीचा फायदा काय?

रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली की, शेतकरी शेती मशगतीवर भर देतो. वर्षभर विविध पिके घेतल्याने शेतजमिनीचा पोत खराब झालेला असतो. त्यामुळे खताचा डोस आणि योग्य पध्दतीने मशागत झाली तर उत्पादनात वाढ होणार आहे.शेत जमिनी आता वखरून त्यावर नांगर चालवल्या जातोय. उष्णतेच्या लाटेत जमीन तापली तरच येणारी सुगी चांगली येते, त्यासोबतच कीड आणि अळ्यांचा नायनाट होत असतो. त्यामुळे तळपत्या उन्हात बळीराजा शेतीच्या मशागतीत व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

आजही पारंपरिक औजारांवर भर

काळाच्या ओघात शेतीपध्दतीमध्ये बदल झाला असून उत्पादन आणि वेळीची बचत व्हावी म्हणून बैलजोडीची जागा आता ट्रॅक्टरने घेतली आहे. नांगरण्यापासून ते पेरणीपर्यंतची कामे ट्रॅक्टरद्वारे केली जात आहेत. असे असले तरी बैलजोडीशिवाय योग्य पध्दतीने शेती मशागत होत नाही असे कही शेतकऱ्यांचे म्हणणे असून ते बैलजोडीच्या मदतीनेच शेती मशागतीची कामे करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सध्या बैलजोडीच्या माध्यमतातून कुळपणी, मोगडणे आदी कामे सुरु आहेत.

इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर परवडत नाही

शेती मशागतीमध्ये यांत्रिकिकरण वाढले असून त्यामुळे वेळेची बचत होत असली तरी शेतकऱ्यांचा खर्च मात्र दुपटीने वाढला आहे. कारण सध्या शेतजमिनीची नांगरट करण्यासाठी एकरी 2 हजार रुपये तर रोटरण्यासाठीही 2 हजार रुपये मोजावेल लागत आहेत. खुरटणी 1 हजार रुपये, पेरणी 1 हजार 500 रुपये, पालकुट्टी 2 हजार 500 रुपये तर हळद काढणीसाठी एकरी 2 हजार रुपये मोजावे लागत आहेत. प्रत्येक कामामध्ये दर वाढले आहेत.

संबंधित बातम्या :

PMFBY : वन्यप्राण्यांकडून पिकांचे नुकसान..! केंद्र सरकारचा मोठा निर्णय?

Central Government : खाद्यतेल, तेलबियांवरील साठामर्यादेच्या कालावधीत वाढ, दरावर काय परिणाम?

Lemon : हंगामी पिकेच शेतकऱ्यांना यंदा तारणार, कलिंगडपाठोपाठ लिंबाला ‘सोन्या’चा भाव

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली