AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कापूस उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर ; शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी सरकारचे ‘हे’ प्रयत्न

देशात 3.80 दशलक्ष गाठींचे उत्पादन होत आहे. जागतिक उत्पादनाच्या तुलनेत एकट्या भारत देशामध्ये 25 टक्के उत्पादन होत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कापसाच्या निर्यातीमध्येही भारतानेच बाजी मारलेली आहे. कापड उद्योगासाठी सर्वकाही अनुकूल असताना याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे कपडा मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे.

कापूस उत्पादनात भारत जगात पहिल्या क्रमांकावर ; शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी सरकारचे 'हे' प्रयत्न
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 08, 2021 | 1:15 PM
Share

मुंबई : यंदा कापसाचे क्षेत्र दरवर्षीच्या तुलनेत घटलेले असले तरी भारत हा कापूस उत्पादनात जगामध्ये अव्वलस्थानी आहे. देशात 3.80 दशलक्ष गाठींचे उत्पादन होत आहे. जागतिक उत्पादनाच्या तुलनेत एकट्या भारत देशामध्ये 25 टक्के उत्पादन होत आहे. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या कापसाच्या निर्यातीमध्येही भारतानेच बाजी मारलेली आहे. कापड उद्योगासाठी सर्वकाही अनुकूल असताना याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार असल्याचे कपडा मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले आहे. ते साआयटीआय च्या वेबसेमीनारच्या दरम्यान बोलत होते. उत्पादनाबरोबरच शुध्द आणि चांगल्या प्रकारचा कापूसही भारतामधूनच निर्यात होत असून ही अभिमानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

सरकारची तयारी आणि शेतकऱ्यांना काय होणार फायदा

भारतात पिकवलेल्या चांगल्या दर्जाच्या कापसाची निर्यातही मोठ्या प्रमाणात होत आहे. आता कापसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कापसाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकार जबद गतीने पावले उचलत आहे. आता 3.60 लाख गाठी कापूस उत्पादनासह भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. शिवाय जागतिक उत्पादनाच्या तुलनेत 25 टक्के उत्पादन हे आपल्या देशाचे आहे. आता मुक्त व्यापार कराराच्या संदर्भात विकसित देशांशी संवाद साधत असल्याचेही पियुष गोयल यांनी स्पष्ट केले. वाढत्या उत्पादनाचा थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा याकरिता वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी समान आणि व्यापक स्वरुपात संधी प्रदान करण्यासही मदत केली जाणार आहे.

काय आहे सरकारचे धोरण

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि या क्षेत्राच्या विकासाला चालना देणे आवश्यक आहे. वस्त्रोद्योग वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पाठबळ दिले जाणार आहे. यामधून आपल्या मालाला एक प्रकारचे मुल्यांकन मिळणार आहे. याकरिता उत्पादनाची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणार असल्याचेही कपडा मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले.

जागतिक स्तरावर वेगळे महत्व

कापूस वस्त्रोद्योग निर्मितीच्या बाबतीत भारताची 3000 वर्षांहून अधिक काळची जागतिक मक्तेदारी आहे. जागतिक कापूस उद्योगातील हेच वर्चस्व परत आणण्याची गरज आहे. आता प्रथमच भारतीय कापसाच्या ब्रँडिंगला जागतिक स्तरावर मान्यता मिळू लागली आहे. जागतिक स्तरावर ब्रँड इंडियाचा प्रीमियम कच्चा माल म्हणून मास्क कॉटन उदयास येण्याची क्षमता आहे. याशिवाय शेतीपातळीवर प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांना ‘कापूस’ काढणा-या यंत्रांचा वापर करण्याचे आवाहन पियुष गोयल यांनी केले.

उत्पादनाबरोबरच गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न

देशात कापसाचे उत्पादन तर वाढतच आहे पण त्याचबरोबर गुणवत्ताही सुधारणे आवश्यक आहे. यामुले जागतिक बाजारगेठेत आपल्या कापसाचे महत्व कायम राहणार आहे. अनावश्यक खर्च टाळून स्पर्धेत टिकून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कापसाची उत्पादकता हेक्टरी ही 457 किलोची आहे ती 800 किलोपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. (India ranks first in the world in cotton production, government’s efforts to benefit farmers)

संबंधित बातम्या :

आठ दिवसांमध्येच उरकून घ्या खरीपातील कामे, अन्यथा उरल्या- सुरल्या पीकांचेही नुकसान

धक्कादायक! आता शेतकऱ्यांच्या गृहलक्ष्मीचीही आत्महत्या, मराठवाडा- विदर्भात शेतकरी महिला आत्महत्या कशा थांबणार?

Special Story ! टोकण पध्दतीने सोयाबीनचे भरघोस उत्पादन, काय आहे टोकण पध्दत ?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.