भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल

देशातील पोषक वातावरण आणि गव्हाचे वाढत असलेले उत्पादन या दोन्हीही गोष्टी भारताच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत. कारण येत्या 2 महिन्यांमध्ये देशातून 20 लाख टनापेक्षा अधिक गहू निर्यात केला जाणार आहे. गेल्या 7 वर्षातील ही सर्वाधिक निर्यात असणार आहे.

भारत देशातील गहू स्वस्त अन् मस्तही, जागतिक बाजारपेठेतही घेतली जातेय दखल
संग्रहीत छायाचित्र

मुंबई : देशातील पोषक वातावरण आणि गव्हाचे वाढत असलेले उत्पादन या दोन्हीही गोष्टी भारताच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या आहेत. कारण येत्या 2 महिन्यांमध्ये देशातून 20 लाख टनापेक्षा अधिक (Wheat exports) गहू निर्यात केला जाणार आहे. गेल्या 7 वर्षातील ही सर्वाधिक निर्यात असणार आहे. याशिवाय जागतिक बाजार पेठेत आपल्या गव्हाला एक वेगळेच महत्व आहे. यामागचे कारण म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारतीय गव्हाची किंमत स्पर्धात्मक राहते आणि म्हणूनच येथील (increase in production) गहू खरेदी केला जात आहे.

अमेरिकेच्या कृषी विभागाने (USDA) परकीय कृषी सेवा विभागाने (AFAS) आपल्या ताज्या अहवालात भारताच्या गव्हाच्या निर्यातीचा अंदाज40 लाख 50 हजार टनांवरून 52 लाख 5  हजार टनांवर गेला आहे. खरंच, जवळच्या बाजारपेठांसाठी भारतीय गव्हाची किंमत कमी दिसत आहे. भारत चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणित गहू वाजवी किंमतीत पुरवत आहे. म्हणूनच निर्यातीसाठी नवीन सौदे सापडत आहेत.

भारतामधून या देशामध्ये निर्यात

अमेरिकन कृषी विभागाने म्हटले आहे की, ऑगस्टमध्ये भारताच्या गहू निर्यातीच्या किंमती ह्या 19 हजार 889 रुपये आहेत आणि शेजारच्या देशांना निर्यात केल्यामुळे कमी मालवाहतुकीचा फायदा झाला आहे. भारत सध्या बांगलादेश, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, मलेशिया आणि पश्चिम आशियातील देशांना गहू निर्यांत करीत आहे. नेपाळसारख्या देशात भारत वाहनांद्वारे गहू निर्यात करतो. दुसरीकडे, इतर देशांकडून गव्हाच्या निर्यात किंमतींचा विचार केला तर युक्रेन आणि सोव्हिएत युनियनच्या इतर माजी सदस्य देशांमध्ये उत्पादित गव्हाची किंमत 26 हजार 868 एवढी आहे.

नवीन निर्यात सौदे होताच गव्हाच्या किंमती वाढतात

कृषी आणि प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्षाच्या पूर्वार्धात गव्हाची निर्यात 20 लाख 34 हजार टनांवर पोहोचली, ज्याची किंमत 4 हजार 590 कोटी रुपये होती. बांगलादेश हा भारतीय गव्हाचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. त्यानंतर श्रीलंका आणि नेपाळ चा क्रमांक लागतो. एप्रिलमध्ये कापणीच्या वेळी एमएसपीपेक्षा खूपच कमी असलेल्या निर्यात सौद्यांमुळे गव्हाच्या किंमती वाढत आहेत. कापणीच्या वेळी शेतकऱ्यांनी गहू 1500 रुपये प्रति क्विंटल दराने विकला, पण सध्या हा भाव 1950 रुपये प्रति क्विंटल च्या आसपास आहे.

संबंधित बातम्या :

…तरीही सोयाबीनवरच भर, बिजोत्पादनासाठी महाबीजच्या मदतीला कृषी विभागही सरसावला

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! आता नाही भासणार खताची टंचाई, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

सोयाबीनच्या दर वाढणारच शेतकऱ्यांनी केवळ ‘या’ गोष्टींचे पालन करावे, शेतकऱ्यांना कृषितज्ञांचा काय आहे सल्ला?

Published On - 5:29 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI