AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसात भिजलेल्या सोयाबीनची काढणी- मळणीच महत्वाची, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला

राज्यात सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये तर वाढ होत आहे पण उत्पादन मात्र कमीच आहे. यामध्ये निसर्गाचा लहरीपणा असला तरी काढणी आणि त्यानंतर त्याची मळणी हा महत्वाचा भाग आहे. सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण योग्य पध्दतीने केली तर बियाणांची प्रत तर वाढणार आहेच शिवाय भविष्यात पेरणीसाठी चांगले बियाणे देखील राहणार आहे.

पावसात भिजलेल्या सोयाबीनची काढणी- मळणीच महत्वाची, शेतकऱ्यांना महत्वपूर्ण सल्ला
संग्रहीत छायाचित्र
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 5:11 PM
Share

लातूर : सोयाबीन (Soyabean) हे खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे. राज्यात सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये तर वाढ होत आहे पण उत्पादन मात्र कमीच आहे. यामध्ये निसर्गाचा लहरीपणा (Heavy Rain) असला तरी काढणी आणि त्यानंतर त्याची मळणी हा महत्वाचा भाग आहे. सोयाबीनची काढणी, मळणी आणि साठवण योग्य पध्दतीने केली तर बियाणांची प्रत तर वाढणार आहेच शिवाय भविष्यात पेरणीसाठी चांगले बियाणे देखील राहणार आहे.

सध्या पावसामुळे सोयाबीनची काढणी कामे ही लांबलेली आहेत. पण अशा वेळीही योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या महत्वाच्या प्रसंगी काय काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहणार आहोत..

काढणी प्रक्रिया.

– जून महिन्यात पेरणी केलेले सोयाबीन आता काढणीला आलेले आहे. पेरणीनंतर काढणी ही 90 ते 100 हे पीक काढणी योग्य होते. पीक परिपक्व झाल्यास त्याची वेळेत काढणी महत्वाची आहे. अन्यथा शेंगा ह्या तडकल्या जातात. त्यामुळे उत्पादनात घट होते. – सोयाबीनचे उत्पादन आणि दर्जा चांगला राखण्यासाठी पावसाचा अंदाज घेऊन काढणीला सुरवात करावी. कारण काढणी नंतर पाऊस झाला तर सोयाबीन उगवण्याचा धोका असतो. – बियाणातील ओलावा 15 टक्के असतानाच कापणीला सुरवाात करावी लागणार आहे. वेळेवर कापणी केल्यास पिकाचा खराबा होत नाही शिवाय उत्पादनातही वाढ होते. – काढणी केलेले पिक ऊनामध्ये चांगल्या प्रकारे वाळवणे महत्वाचे आहे. शिवाय मळणीसाठी उशीर होत असल्यास त्याची गंज लावून ठेवावी. बराच काळ गंज लावून ठेवली तर बुरशी लागण्याचा धोका असतो त्यामुळे काढणी झाली का वेळेत मळणी ही गरजेची आहे.

मळणी करताना घ्यावयाची काळजी

– सोयाबीनच्या बियाणातील आर्द्रता ही 14 टक्के पेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राची फेरे हे देखील 300 ते 400 प्रति मिनीट असणे आवश्यक आहे. – मळणीच्या दरम्यान बियाणावर लक्ष ठेवावे. त्यामुळे त्याची डाळ होणार नाही. शिवाय डाळ होण्याचे प्रमाण जर जास्त असेल तर मशीनचा वेग हा कमी करावा.

काय काळजी घ्यावयाची आहे

सोयाबाीनची काढणी झाल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या परीपक्वतेनुसार 100 ते 110 दिवसांनी काढणी करणे आवश्यक आहे. काढणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली तर दरम्यानच्या काळाक सोयाबीन वाळवले तर अधिकचा फायदा होणार आहे. मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 400 आरपीएम एवढीच असणे आवश्यक आहे. अन्यथा बियाणांचे आवरण हे खराब होते व त्याचा परिणाम सोयाबीनच्या दर्जावर होणार आहे. शिवाय बिजोत्पादनादरम्यान बीया ची उगवण ही नीट होणार नाही.

साठवणीकपुर्वी काय करावे

मळणी झालेल सोयाबीन हे सावलीमध्ये वाळवावे..वाळवताना थराची जाडी ही 5 सेंटीमिटरपेक्षा अधिक असू नये. अन्यथा आर्द्रता वाढून बुरशीचा धोका निर्माण होतो. कडक उन्हामध्ये सोयाबीन वाळवल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार आहे. साठवणुकी दरम्यान मॅाश्चरचे प्रमाण हे 8 ते 10 टक्केच असणे गरजेचे आहे अन्यथा किडीचे प्रमाण वाढण्याचा धोका होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशिराने पेरणी केलेली आहे त्या सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते. (It is important to take care of harvested soyabean, important advice to farmers)

संबंधित बातम्या :

मोहरीने मिळेल उभारी ; दरात 400 रुपयांची वाढ, लागवडीसाठीही पोषक वातावरण

शेतातले सोयाबीन थेट बाजारात, लातूरात आवक दुपटीने वाढली

शेतकऱ्यांनो कागदपत्रांची पुर्तता करा अन् ‘पी.एम. किसान सन्मान’ योजनेचा निधी मिळवा, अन्यथा…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.