AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीनला माफक दर, पावसाने आवक घटली

गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. मात्र, गुरुवारचे दर हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत. शिवाय उडीदाचे दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. गुरुवारी दुपारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 74011 क्विंटलचा दर मिळाला तर पोटगीतले दर हे 6700 एवढे होते. त्यामुळे दोन दिवसाच्या तुलनेत एक हजाराने दर वाढलेले आहेत.

शेतकऱ्यांना दिलासा : सोयाबीनला माफक दर, पावसाने आवक घटली
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 4:14 PM
Share

लातूर : सोयाबीन दराच्या चढ-उतारामुळे नेमके बाजारात काय चित्र राहणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. शिवाय लातूरच्या बाजारपेठेला मराठवाड्यात महत्व आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात घसरण होत आहे. मात्र, गुरुवारचे दर हे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आहेत. शिवाय उडीदाचे दरही स्थिर असल्याने शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. गुरुवारी दुपारी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 74011 क्विंटलचा दर मिळाला तर पोटगीतले दर हे 6700 एवढे होते. त्यामुळे दोन दिवसाच्या तुलनेत एक हजाराने दर वाढलेले आहेत.

खरिपातील नव्या सोयाबीनची आवक सुरु झाली की, दर घटण्यास सुरवात झाली होती. गेल्या आठवड्यात 11 हजार रुपयांवर गेलेले सोयाबीन थेट 5 हजारवर आले होते. त्यामुळे निसर्गाने तर पिकाचे नुकसानच झाले आहे पण बाजारात देखील दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. गुरुवारी सोयाबीनची आवक केवळ 3 हजार कट्ट्यांची होती. तर बुधवारी 5 हजार कट्टे सोयाबीन हे बाजारात दाखल झाले होते.

आवक कमी झाली की दर वाढत आहेत. शिवाय दोन दिवसापासून मराठवाड्यात पाऊस होत असल्याने काढणीही रखडली आहे. त्याचाच परिणाम हा आवकवर होत असल्याचे बालाजी जाधव यांनी सांगितले आहे. सोयाबीनचे दर हे कमी-अधिक होत असले तरी उडीदाचे दर हे स्थिर आहेत. गेल्या आठ दिवसांपासून उडीदाला 7 हजार ते 7 हजार 400 चा दर मिळत आहे. पावसाने उडीद डागाळलेला असला तरी चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पैसे पडत आहेत.

हंगामाच्या सुरवातीला पेरणी झालेले सोयाबीन बाजारात दाखल होत आहे. तर उशीरा पेरणी झालेले सोयाबीनची काढणी कामे रखडलेली आहेत. त्यामुळे भविष्यात सोयाबीनचे दर काय राहतील यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न अवलंबून आहे.

दोन दिवसापासून आवक घटली

सोयाबीनला 10 हजाराचा दर होता. य दरम्यान, लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 40 ते 45 हजाक कट्ट्यांची आवक होती. मात्र, सोमवारपासून दरात घट होण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे बुधवारी 5 हजार तर गुरुवारी केवळ 3 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शिवाय दोन दिवसापासून पाऊस असल्याने काढणी कामे रखडली परिणामी आवक ही घटलेली आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. बुधवारी लाल तूर- 6500 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6570 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6400 रुपये क्विंटल, जानकी चना 5100 रुपये क्विंटल, विजय चणा 5400, चना मिल 4900, सोयाबीन 7411, चमकी मूग 6750, मिल मूग 6000 तर उडीदाचा दर 7422 एवढा राहिला होता.

शेतकऱ्यांनाही माफक दराचीच अपेक्षा

खरीपातील एकही पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले नाही. सोयाबीन हे मुख्य पीक असूम किमान सोयाबीनला 7 हजाराचा दर राहवा हा अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. मध्यंतरी सलग दोन दिवत दर घसरल्याने चिंता वाढली होती पण गुरुवारी सोयाबीन हे 7 हजार 400 वर गेले होते. (Latur market price: Relief to farmers: Soyabean gets modest rate, urad prices stable )

संबंधित बातम्या :

काय सांगता ? यंदाच्या पावसाळ्यात लेंडी नदीच्या पूरामुळे 10 गावांचा 48 वेळा संपर्क तुटला

पांढरं सोनं दिसतंय पण काढता येईना, खानदेशातील शेतकऱ्यांची अवस्था

जिल्ह्याबाहेरील ऊसाला बीडच्या शेतकऱ्यांचा विरोध, काय आहेत कारणं?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.