AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय सांगता ? यंदाच्या पावसाळ्यात लेंडी नदीच्या पूरामुळे 10 गावांचा 48 वेळा संपर्क तुटला

पालम येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तरी शहरालगतच्या 10 गावांचा संपर्क तुटतो. आतापर्यंतच्या पावसाळ्यात शहराला लागूनच असलेल्या लेंडी नदीला 48 वेळा पूर आला आणि प्रत्येक वेळी नदीच्या पलिकडे असलेल्या गावांचा संपर्क हा तुटतोच. अशीच अवस्था बुधवारी झालेल्या पावसामुळे झाली आहे.

काय सांगता ? यंदाच्या पावसाळ्यात लेंडी नदीच्या पूरामुळे 10 गावांचा 48 वेळा संपर्क तुटला
पालम (जि. परभणी) शहरालगतच्या लेंडी नदीला पूर आल्याने 10 गावांचा संपर्क तुटला
| Edited By: | Updated on: Sep 23, 2021 | 2:40 PM
Share

प्रशांत चलिंद्रवार परभणी : पावसाला सुरवात झाली की जशी बत्ती गुल होते अगदी त्याप्रमाणेच पालम (Parbhani) येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तरी शहरालगतच्या 10 गावांचा संपर्क तुटतो. (River) आतापर्यंतच्या पावसाळ्यात शहराला लागूनच असलेल्या लेंडी नदीला 48 वेळा पूर आला आणि प्रत्येक वेळी नदीच्या पलिकडे असलेल्या गावांचा संपर्क हा तुटतोच. अशीच अवस्था बुधवारी झालेल्या पावसामुळे झाली आहे. या नदीच्या पुलावरील पाणी हे वाढत असल्याने आज (गुरुवारी) दिवसभर पूलावरील वाहतूक ही ठप्प राहणार आहे. पालम शहराजवळूनच लेंडी नदीचा प्रवाह आहे. मात्र, या नदीवरील पुलाची ऊंची कमी असल्याने मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तरी पुलावरुन पाणी वाहते. सध्या पालम ते जांभूळ बेट या रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने फळा, सोमेश्वर, घोडा, आरखेड, उमरथडी व सायळा या गावातील ग्रामस्थांची ये-जा बंद झाली आहे. तर याच मार्गावरील पालम ते पुयणी रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने पुयणी, आडगाव, वनभूजवाडी, तेलजापूर या गावांचा पालम शहराशी संपर्क हा तुटलेला आहे.

यंदा पावसाच्या प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आतापर्यंत तब्बल 48 वेळा या लेंडी नदीला पूर आला असून संपर्क तुटल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पालम तालुक्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे पुलावरील पाणी हे वाढत असून गुरवारी दिवसभर हा पूल वाहतुकासाठी बंद राहणार आहे.

पुलाची ऊंची कमी असल्याने दैना

लेंडी नदीवरील पुलाची ऊंची ही कमी आहे. त्यामुळे मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तरी या नदीला पूर यतोच. हे नित्याचेच झाले आहे. यामुळे पालम शहराला लागून असलेल्या 10 गावातील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या 10 गावांना पालम हीच मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, संपर्क तुटल्याने गैरसोय होत आहे. तालुक्यातील कोपटा गावाचीही अवस्था अशीच असून गतवर्षी या गावालगतच्या नदीचा तीन वेळा पूल हा वाहून गेला होता. तरी प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष, गावकऱ्यांना नाहक त्रास

दरवर्षी पावसाळा सुरु झाला की लेंडी नदीला पूर हे ठरलेलेच आहे. या 10 गावातील ग्रामस्थांनी पूलाची ऊंची वाढवून घेण्याची मागणी प्रशासन दरबारी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता लोकप्रतिनीधीने तरी ग्रामस्थांच्या यातना पाहून पुलाची ऊंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

केवळ डागडुजीवर भर

नदीवरचे पूल वाहून गेले तरी अद्यापर्यंत प्रशासनाने कायम स्वरुपी तोडगा हा काढलेलाच नाही. नळकांडी पूलावरील भराव वाहून गेला तरी केवळ मुरुमाने डागडुजी केली जात आहे. मात्र, पावसामुळे जैसे थे अशीच अवस्था या पूलाची होत आहे. (Landi river flooded, 10 villages cut off, road closed for traffic)

इतर बातम्या :

उभारणीपासून 14 वेळा भरले मांजरा धरण, काय होता उद्देश आणि सध्याचे वास्तव

नाशिकः सोयाबीन स्वस्त अन् ढेप महाग; भाव 40 हजारांवरून चक्क 95 हजारांवर

बीडमध्ये पावसामुळे सोयाबीनचा दर्जाही ढासळला अन् दरही घसरला

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.