सोयाबीनची आवक वाढली तर दर घसरले, पावसाचा परिणाम सोयाबीन पीकावर

सोयाबीन काढणीला आता वेग आला असून काढणी झाली की आवक ही वाढत आहे. मात्र, पावसाने सोयाबीन हे काळवंडले असल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक आणि मालाचा दर्जाही घसरला असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.

सोयाबीनची आवक वाढली तर दर घसरले, पावसाचा परिणाम सोयाबीन पीकावर
संग्रहीत छायाचित्र

लातूर : सोयाबीन (Soyabean) काढणीला आता वेग आला असून काढणी झाली की आवक ही वाढत आहे. मात्र, पावसाने सोयाबीन हे काळवंडले असल्याने त्याचा दरावर परिणाम होत आहे. मोठ्या प्रमाणात होत असलेली आवक आणि मालाचा दर्जाही घसरला असल्याने शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे. पावसाने काढणीला उशीर झाला आहे शिवाय अजूनही (Marathwada) मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरुच आहे. याचा परिणाम देखील उर्वरीत पीकावर होणार असल्याने शेतकरी चिंतेत आहे. दोन दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे दर हे 200 रुपयांनी कमी झाल्याचे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहवयास मिळाले आहे.

मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन काढणीची कामे ही सुरु झालेली आहेत. पावसाचे पाणी शेतामध्ये साचले असताना देखील शेतकरी सोयाबीन हे वावराबाहेर काढत आहे. एकतर पीकाचे नुकसान झालेच आहे. शिवाय रब्बी हंगामासाठी शेत हे रिकामे करायचे असल्याने ग्रामीण भागात 4000 रुपये एकर प्रमाणे मजूरी असताना देखील काढणी कामे वेगात सुरु आहेत. मात्र, आवक वाढताच दर हे कमी होऊ लागले आहेत. गुरुवारी सोयाबीनला 5800 चा दर होता तर शुक्रवारच्या बाजारात 5600 चा दर मिळाला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होत आहे पण साठवणूक करुन अधिकचे नुकसान होण्यापेक्षा आहे त्या दरात सोयाबीनची विक्री केली जात आहे. दुसरीकडे उडदाचे दर हे स्थिर आहेत. मात्र, उडदाची आवक ही कमी झाली आहे. हंगामाच्या सुरवातीपासून उडदाची आवक होती. खरीपातील याच पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिलेला होता. परंतू, सोयाबीनच्या तुलनेत उडदाचे क्षेत्र निम्म्यानेही नाही त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून आवक ही कमी झालेली आहे. शुक्रवारी उडदाला 7300 चा दर मिळाला होता.

बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाने काही प्रमाणात उघडीप दिली असल्याने लातूर येथील बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढलेली आहे. मात्र, पाण्यात सोयाबीन राहिल्याने दर्जा ढासाळलेला आहे. परिणामी मिळेल त्या दरात विक्री करण्याची नामुष्की ही शेतकऱ्यांवर ओढावलेली आहे.

10 हजार क्विंटलची आवक

यंदाच्या हंगामात आतापर्यंत लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक आवक ही शुक्रवारी झाली आहे. 10 हजार क्विंटल सोयाबीन हे दाखल झाले होते. तर मालाच्या दर्जानुसार किंमतही ठरवली जात होती. सुरवातीच्या काळात पावसाचा परिणाम न झाल्याने चांगल्या प्रतीचे सोयाबीनची आवक होत होती. त्यामुळे दरही 8800 पर्यंत गेले होते आता आवक आहे पण सोयाबीन हे डागाळलेले आहे.

अशी घ्या पीकाची काळजी

सोयाबाीनची काढणी झाल्यावर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या परीपक्वतेनुसार 100 ते 110 दिवसांनी काढणी करणे आवश्यक आहे. काढणी झाल्यानंतर पावसाने उघडीप दिली तर दरम्यानच्या काळाक सोयाबीन वाळवले तर अधिकचा फायदा होणार आहे. मळणी करताना मळणी यंत्राची गती ही 400 आरपीएम एवढीच असणे आवश्यक आहे. अन्यथा बियाणांचे आवरण हे खराब होते व त्याचा परिणाम सोयाबीनच्या दर्जावर होणार आहे. शिवाय बिजोत्पादनादरम्यान बीया ची उगवण ही नीट होणार नाही.

साठवणीकपुर्वी काय करावे

मळणी झालेल सोयाबीन हे सावलीमध्ये वाळवावे..वाळवताना थराची जाडी ही 5 सेंटीमिटरपेक्षा अधिक असू नये. अन्यथा आर्द्रता वाढून बुरशीचा धोका निर्माण होतो. कडक उन्हामध्ये सोयाबीन वाळवल्यास बियाणाच्या उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम होणार आहे. साठवणुकी दरम्यान मॅाश्चरचे प्रमाण हे 8 ते 10 टक्केच असणे गरजेचे आहे अन्यथा किडीचे प्रमाण वाढण्याचा धोका होतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी यंदा उशिराने पेरणी केलेली आहे त्या सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. शुक्रवारी लाल तूर- 6500 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6370 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6450 रुपये क्विंटल, जानकी चना 5000 रुपये क्विंटल, विजय चणा 5100, चना मिल 4850, सोयाबीन 6250, चमकी मूग 6976 , मिल मूग 6500 तर उडीदाचा दर 725 एवढा राहिला होता. (Latur Market: Soyabean arrivals rise, prices fall as agricultural prices fall)

संबंधित बातम्या :

दोन वर्षांपासून रखडलेला पीक विमा मिळणार पुढच्या वर्षी, उच्च न्यायालयाचे आदेश

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून दोन हजारांची मदत, ‘या’ तारखेपूर्वी कागदपत्रं जमा करा

आता पूर्वसूचनांच्या त्रुटींवर विमा कंपन्यांचे बोट, कृषी आयुक्तालयाकडूनही दखल

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI