टोमॅटोवर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टरवरील पीक संकटात, शेतकऱ्यांना मोठा फटका

येवल्यात टोमॅटो पिकावर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. टिपक्या आणि करपा रोगामुळे हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले आहेत.

टोमॅटोवर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव, हजारो हेक्टरवरील पीक संकटात, शेतकऱ्यांना मोठा फटका
टोमॅटोचं नुकसान
Follow us
| Updated on: Aug 04, 2021 | 3:38 PM

नाशिक : येवल्यात टोमॅटो पिकावर टिपक्या व करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे. टिपक्या आणि करपा रोगामुळे हजारो हेक्टरवरील टोमॅटो पीक संकटात सापडले आहेत. टोमॅटो उत्पादनात या हंगामात 50 टक्‍क्‍यांनी घट होणार असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

येवला तालुक्‍यात अनेक ठिकाणी टोमॅटो पिकाची लागवड करण्यात आली आहे. रिमझिम पाऊस पडत असल्याने हवेतील आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय. टोमॅटो उत्पादनात 50 टक्क्यांनी घट झाली आहे.

उत्पादन कमी होणार असल्यानं संकट

येवला तालुक्यातील बल्हेगाव येथील शेतकरी किरण जमधडे यांनी दीड एकर मध्ये टोमॅटोचे पीक घेतलंय. पीक निघण्यास सुरुवात झाली मात्र ढगाळ वातावरणामुळे व सतत पडत असलेला रिमझिम पाऊसमुळे हवेत आर्द्रतेमुळे टोमॅटो पिकावर काळा टिपका तसेच करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. या शेतकऱ्याच्या टोमॅटो पिकाची पन्नास टक्के घट झाली आहे. उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी हैराण झाला आहे. या शेतकऱ्याला 2000 कॅरेट पिकण्याची अपेक्षा होती. मात्र या रोगाचा प्रादुर्भावामुळे पन्नास टक्के उत्पादनात घट झाल्याने 1000 कॅरेट निघतील, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

टिपका आण करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभ राहिल्याचं कृष्णा फड या शेतकऱ्यांनं सांगितलं आहे.

लासलगावात टोमॅटोच्या लिलावाला सुरुवात

आशिया खंडातील कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 ऑगस्टपासून टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला आहे. कांद्याची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लासलगाव येथील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांद्याबरोबर टोमॅटोचे ही लिलाव गेल्या काही वर्षापासून पार पाडले जात आहेत.

प. पु. भगरीबाबा धान्य आणि भाजीपाला आवारात 2 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला, यावेळी शेतकऱ्यांनी 1790 क्रेट्समधून टोमॅटो लिलावासाठी आणला होता. टोमॅटो लिलाव शुभारंभप्रसंगी 20 किलोच्या टोमॅटो क्रेट्सला कमाल 601, किमान 151 तर सर्वसाधारण 431 रुपये इतका बाजार भाव मिळाला, पण यावेळी व्यापारी, बाजार समिती कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.

इतर बातम्या :

VIDEO : संसद परिसर बनला आखाडा, कृषी कायद्यांवरून हरसिमरत कौर बादल आणि रवनीत बिट्टू भिडले, पाहा व्हिडीओ

शिवनेरीच्या साक्षीनं, जुन्नरच्या निमगिरीत स्वंयचलित हवामान केंद्राची उभारणी,शेतकऱ्यांना एका क्लिकवर अचूक माहिती मिळणार

Nashik tomato farmers facing problems due to karpa

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.