Pest Management: वेलवर्गीय पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा

शेतीमालाचे उत्पादन घटण्यामागे एक ना अनेक कारणे आहेत. लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य खबरदारी घेतली तरच शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होणार आहे. उत्पादन क्षेत्र वाढविण्यापेक्षा घेतलेल्या शेतीमालाचे योग्य नियोजनच उत्पादनवाढीसाठी फायद्याचे ठरणार आहे. आता वेलवर्गीय पिकांवरही किडींचा प्रादुर्भाव होतोच. त्यामुळे वेळत किडीचा बंदोबस्त केला तरच उत्पादनात भर पडणार आहे.

Pest Management: वेलवर्गीय पिकांवर किडींचा प्रादुर्भाव, व्यवस्थापन करा अन् उत्पादन वाढवा
वेलवर्गीय पिकांवरील किडीचा वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात वाढ होणार आहे.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: राजेंद्र खराडे

Apr 24, 2022 | 5:03 AM

पुणे : शेतीमालाचे उत्पादन घटण्यामागे एक ना अनेक कारणे आहेत. (Cultivation of vegetables) लागवडीपासून काढणीपर्यंत योग्य खबरदारी घेतली तरच शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज होणार आहे. उत्पादन क्षेत्र वाढविण्यापेक्षा घेतलेल्या शेतीमालाचे योग्य (Pest Management) नियोजनच (Increase Production) उत्पादनवाढीसाठी फायद्याचे ठरणार आहे. आता वेलवर्गीय पिकांवरही किडींचा प्रादुर्भाव होतोच. त्यामुळे वेळत किडीचा बंदोबस्त केला तरच उत्पादनात भर पडणार आहे. वेलवर्गीय पिकांवर मावा, फुलकिडे, पांढरी माशी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

पिकांवर मावा

पिकांवरील मावा किड ही हिरवट पिवळसर रंगाची असून पानाखाली मोठ्या संख्येने किड आढळते. किडीच्या अंडी, पिले आणि प्रौढ या तीन अवस्था आढळतात. मावा कीडीच्या पिलांना पंख नसतात, परंतु प्रौढांना पंख असतात. मावा कीड पानांखाली राहून पानांतील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. परिणामी, झाडची वाढ खुंटते. मावा शरीरातून पारदर्शक चिकट गोड पदार्थ बाहेर टाकते. त्यामुळे पाने चिकट बनून त्यावर काळी बुरशी वाढते. परिणामी, अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत अडथळा येतो.

फुलकिडीचा प्रादुर्भाव

किडीमार्फत करपा यासारख्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करतात. फुलकिडे साधारणपणे 1 मिमी लांब आणि पिवळसर रंगाचे असतात. अंड्यातून पिले बाहेर पडण्यास या किडीला 5 ते 10 दिवस लागतात. पिले पांढरट पिवळसर रंगाची असतात. पिले आणि प्रौढ फुलकिडे पानांतील रस शोषून घेतात . त्यामुळे पाने वाकडी होतात. या किडीचा प्रादुर्भाव कोरड्या हवामानान जास्त आढळतो.

पांढरी माशी

माशीची पिले ही प्रौढ पानांच्या खालील बाजूस राहतात. पिले पिवळसर रंगाची आणि आकाराने सूक्ष्म असतात. प्रौढ माशी पानांच्या खालील बाजूस अंडी घालते. त्यामळे अंडीही सहज दिसत नाहीत. मादी ही एकाच वेळी साधारण 100 अंडी देते. या अंड्यातून 4-5 दिवसांत पिले बाहेर पडतात. किडीची पिले व प्रौढ पानांतील रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. ही माशी शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर सोडते. त्यामुळे पानावर काळ्या बुरशीची वाढ होऊन पाने काळी पडतात. परिणामी, अन्न निर्माण करण्याच्या प्रक्रियेत बाधा येते. ही कीड विषाणूजन्य रोगांचा प्रसार करते. त्यामुळे प्रत्यक्ष नुकसानीपेक्षा विषाणूजन्य रोगांचा प्रसार होऊन जास्त नुकसान होते.

असे करा नियंत्रण

मावा, तुडतुडे, पांढरी माशी आणि तांबडे कोळी यांनी आर्थिक नुकसान पातळी ओलाडल्यांनतर रासायनिक फवारणी करावी. यामध्ये ॲसिटामिप्रीड (20 टक्के एस . पी.) 0.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (17.8 टक्के एस.एल) 0.5 मिलि किंवा थायामेथोक्झाम (25 टक्के डब्ल्यू.पी. ) 0.3 ग्रॅम किंवा डायमिथोएट (30 टक्के ई.सी.) 1मिलि याचे मिश्रण करुन फवारणी करावी लागणार आहे.

(सदरील माहिती वैभव गिरि यांच्या लेखातील असून शेतकऱ्यांनी कृषी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच पिकांवर फवारणी करावी)

संबंधित बातम्या :

Vegetable Price : पेट्रोल-डिझेलच्या पंगतीमध्ये हिरव्या मिरचीचाही ठसका, लिंबाचा आंबटपणाही कायम..!

Banana : यंदा केळीचा ‘गोडवा’च गायब, अस्मानी संकटानंतर आता महावितरणचा ‘शॉक’

Latur Market : शेतीमालाच्या दरात घट, शेतकऱ्यांसाठी ‘वेट अॅंण्ड वॉच’चा सल्ला..!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें