PM Kisan Scheme: आनंदवार्ता धडकली! पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता मिळणार, केंद्र सरकार करू शकते आज घोषणा
PM Kisan Scheme Update : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. सुरुवातीचे कौल एनडीएच्या बाजूने आहे. त्यातच शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता येण्याची दाट शक्यता आहे. आज याविषयीची घोषणा होऊ शकते.

Central Cabinet Meeting : बिहारमधील निवडणुका झाल्या आहेत. आता 14 नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. त्यातच देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता लवकरच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज बुधवारी 12 नोव्हेंबर रोजी कॅबिनेट बैठक होणार आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची घोषणा होऊ शकते. यापूर्वी 2 ऑगस्ट 2025 रोजी 20 वा हप्ता जमा करण्यात आला होता. यामध्ये 20,500 कोटी रुपयांची रक्कम देशभरातील 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले होते. आता याच महिन्यात 21 व्या हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या चार राज्यातील शेतकऱ्यांना अगोदरच लाभ
अतिवृष्टी, महापूर आणि जमीन खचल्याने उत्तर भारतातील राज्यामधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केंद्र सरकारने 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 वा हप्ता जमा केला आहे. या राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट बँक खात्यात जमा केली आहे.
येथे तपासा तुमचे नाव
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 21 वा हप्ता पात्र शेतकर्यांना मिळेल, ज्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत नसेल त्यांना फायदा होणार नाही. तुम्हाला फायदा होईल की नाही हे घर बसल्या तपासता येईल. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा. लाभार्थ्यांच्या यादीवर जा. तुमचा आधार क्रमाक, खाते क्रमांक नोंदवा. “Get Data” वर क्लिक करा. पेमेंट स्टेट्स चेक करा.
या शेतकऱ्यांना नाही लाभ
ज्या शेतकरी कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असतील वा सेवानिवृत्त असतील त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही. 10 हजार रुपये मासिक पेन्शन घेणाऱ्या सेवानिवृत्तांना या योजनेचा फायदा दिला जात नाही. आयकर भरणाऱ्यांना या योजनेच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. तर पीएम किसान योजनेतंर्गत काही नियम बदलण्यात आले आहे. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल. इतर सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची नवीन नियमावली समोर आली आहे. यामध्ये अनेक बदल झाल्याचे दिसून आले. आज 12 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्यानंतर पीएम किसान योजनेच्या हप्त्याविषयी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात 21 वा हप्ता कधी जमा होईल याची माहिती समोर येऊ शकते.
