AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी ! पंतप्रधान मोदी या दिवशी जाहीर करणार पीएम किसन योजनेचा आठवा हप्ता

या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनापासून निमंत्रण आहे. (Prime Minister Modi will announce the eighth installment of PM Kisan Yojana on this day)

शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी ! पंतप्रधान मोदी या दिवशी जाहीर करणार पीएम किसन योजनेचा आठवा हप्ता
पीएम किसान योजना
| Updated on: May 11, 2021 | 3:22 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan)च्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी डिसेंबरमध्ये या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला. निवडणूक व कोरोना साथीच्या आजारामुळे आठवा हप्ता येण्यास उशीर झाला. पण आता शेतकऱ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 मे रोजी म्हणजेच शुक्रवारी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील. यानंतर ते पंतप्रधान किसान योजनेंतर्गत पुढचा हफ्ता जाहीर करतील. मंगळवारी सकाळी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांना यासंदर्भात एक मॅसेजही प्राप्त झाला आहे. मॅसेजमध्ये असे लिहिले आहे की, माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 14 मे 2021 रोजी सकाळी 11 वाजता शेतकऱ्यांशी चर्चा करतील आणि पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता जाहीर करतील. या कार्यक्रममध्ये आपण pmindiawebcast.nic.in किंवा दूरदर्शनच्या माध्यमातून संपर्क साधू शकता. तुम्हाला कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मनापासून निमंत्रण आहे. (Prime Minister Modi will announce the eighth installment of PM Kisan Yojana on this day)

1 डिसेंबर 2018 पासून लागू आहे ही योजना

लोकसभा निवडणुका 2019 पूर्वी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. तथापि, 1 डिसेंबर 2018 पासून प्रभावी मानले गेले. पहिल्यांदा 3 कोटी 16 लाख 05 हजार 539 शेतकर्‍यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळाला. या योजनेंतर्गत आतापर्यंत 10 कोटीहून अधिक शेतकर्‍यांची नोंदणी झाली आहे. डिसेंबरमध्ये जाहीर केलेला हप्ता 10 कोटी 70 हजार 978 शेतकऱ्यांना देण्यात आला. आर्थिक वर्ष 2020-21 च्या एप्रिल ते जुलैच्या हप्त्यात जास्तीत जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळाली. यावेळी केंद्र सरकारने एकूण 10 कोटी 48 लाख 95 हजार 545 शेतकर्‍यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठविले होते.

2-2 हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये वार्षिक 6000 रुपये मिळतात

पंतप्रधान किसान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाच वेळी 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले होते. त्यानंतर आतापर्यंत 10 कोटी 71 हजार 7 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यात आले आहेत. डिसेंबर 2019 ते मार्च 2020 पर्यंत 8 कोटी 95 लाख 15 हजार 225 शेतकर्‍यांना पैसे मिळाले. त्याअंतर्गत, 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. जेणेकरून ते याचा उपयोग कृषी कामात करु शकतील.

पश्चिम बंगालमधील 10 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होणार

कृषी मंत्रालयाच्या नोव्हेंबर 2020 पर्यंत आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील 21.79 लाख शेतकर्‍यांनी पंतप्रधान किसान योजनेसाठी पोर्टलवर नोंदणी केली होती. पोर्टलवर 14 लाख 91 हजार शेतकर्‍यांचा डेटा अपलोड करण्यात आला असून त्यापैकी 9.84 लाख डेटा सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) साठी तयार आहेत. पीएफएमएससाठी डेटा तयार करणे म्हणजे या शेतकर्‍यांच्या खात्यावर 2-2 रुपये पाठविण्यासाठी आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. या वेळी या शेतकऱ्यांना पैसे मिळतील असा विश्वास आहे. (Prime Minister Modi will announce the eighth installment of PM Kisan Yojana on this day)

इतर बातम्या

पहिल्या पत्नीपासून एक मुलगा, दुसऱ्या पत्नीसोबतही वाद, मध्यरात्री हत्या करुन पोलीस ठाण्यात दाखल, आरोपी पतीने असं का केलं?

PM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.