AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agricultural : शेत जमिनीची धूप थांबवा अन् उत्पादन वाढवा, काय आहे उपाययोजना?

शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

Agricultural : शेत जमिनीची धूप थांबवा अन् उत्पादन वाढवा, काय आहे उपाययोजना?
शेतजमिन
| Updated on: May 03, 2022 | 5:15 AM
Share

लातूर : शेती उत्पादन वाढवण्यासाठी काही निवडक घटकच जसे शेती मशागत, बी-बियाणे, खते हेच महत्वाचे नाही तर शेत जमिनीच्या आरोग्यापासून ते बाजारपेठेपर्यंतचे नियोजन शेतकऱ्यांना करावे लागणार आहे. त्यापैकीच (Soil erosion) जमिनीची होणारी धूप हा एक महत्वाचा घटक आहे. जमिनीची धूप झाली तर त्याचा दर्जा खलावते आणि (Production) उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे जमिनीची धूप रोखण्याचे काय उपाय आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे. मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी  (Rain Water) पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. काळाच्या ओघात शेतकरी उत्पादन वाढीवर लक्ष केंद्रीत करीत आहे. याच दरम्यान जमिनीची धूप रोखली तर उत्पादनात भर पडणार आहे. पण ही प्रक्रिया कशी आहे याबाबत शेतकरी हे अनभिज्ञ आहेत. त्यामुळे सर्वात अगोदर यावरील उपाययोजनांची माहिती घेणे गरजेचे आहे.

गवतामुळे धूपही रोखली जाते अन् चाराही

शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते. ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते. त्याचा उपयोग दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून तर होतोच; शिवाय जमिनीवर आच्छादन निर्माण होऊन जमिनीची धूप थांबते.

जमिन धूप रोखण्याचे उपाय

जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी. शिवाय पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावी लागणार आहेत.

शेती मशागतही महत्वाची

शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे

यामुळे होते जमिनीची धूप

शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते.

(सदरील माहिती शेतकरी मित्र विजय भुतेकर यांच्या लेखातील आहे, कृषी अधिकारी यांच्या सल्ल्यानेच प्रक्रिया करावी)

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.