AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?

Farmer Loan Waiver : 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता येऊन धडकली आहे. महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफीतही एक मोठा फायदा होणार आहे. काय आहे सरकारचा निर्णय?

Farmer Loan Waiver: 2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता! आता कोणता मिळणार फायदा?
2019 मध्ये कर्जमाफी मिळालेल्या शेतकर्‍यांसाठी आनंदवार्ता
| Updated on: Jun 25, 2026 | 4:56 PM
Share

Farmer Loan Waiver 2026 : 2019 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना राबवली होती. नवीन कर्जमाफी योजनेत या शेतकर्‍यांना लाभ मिळणार नाही असा आरोप करण्यात येत होता. पण आता नवीन आलेल्या माहितीनुसार, ठाकरे सरकारच्या काळात कर्जमुक्ती मिळालेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ममाफी योजेनेतंर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची एक उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या मंत्रिगटाच्या उपसमितीत याविषयीची चर्चा झाल्याचे समजते. जुन्या लाभार्थ्यांना किती प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. त्यांना अजून काय फायदा होईल याविषयीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच जाहीर करणार आहेत, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांचे थकीत 2 लाख सरकार भरणार

राज्यात यापूर्वी 2017 मध्ये 1.5 लाख रुपये, 2019 मध्ये दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात आली होती. नव्या योजनेतंर्गत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंटची तरतूद करण्यात आली आहे. थकीत कर्जातील दोन लाख रुपये सरकार भरणार आहेत. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांनी भरायची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते नियमित होईल आणि त्यांना पुन्हा कर्ज मिळण्याची सोय होईल.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना नवीन कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांनाही फायदा?

उष्माघाताने मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ही सरकारच्या विचाराधीन असल्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले. वन टाईम सेटलमेंटचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 मार्च 2027 रोजीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. व्यापारी बँकांनाही या प्रक्रियेत आवश्यक सलवती देण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. पण विरोधी पक्षाने संपूर्ण कर्जमाफीची मागणी करत सभात्याग केला.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!