AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली…येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्‍यांना ही मिळणार लाभ?

Farmer Loan Waiver Update: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी वेगाने सुरू झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मॅसेज येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत मोठी माहिती दिली.

Farmer Loan Waiver: 56 लाख शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! प्रतिक्षा संपली...येणार कर्जमाफीचा मॅसेज, 2019 मधील कर्जमाफीतील शेतकर्‍यांना ही मिळणार लाभ?
शेतकरी कर्जमाफी योजना
| Updated on: Jun 25, 2026 | 9:23 AM
Share

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: पावसाने दमदार बॅटिंग केल्यानंतर आता शेतकऱ्यांसाठी अजून एक मोठी आनंदवार्ता धडकली आहे. राज्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरी शेतकरी कर्जमाफी योजनेची वेगाने अंमलबजावणी सुरू असून लवकरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मॅसेज येणार आहे. राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळेल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी दिली.

वन टाईम सेटलमेंट

राज्य मंत्रिमंडळाने 2 जून 2026 रोजी सदर योजनेला मंजूरी दिली होती. राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत मंजूरी देण्यात आली होती. महायुती सरकारने 30 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंतचे दोन लाखांचे कर्ज माफ करण्याचे धोरण ठरवले आहे. दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना लागू केली आहे. सरकारने व्यापारी व संबंधिक बँकांना योजनेतंर्गत निर्देश दिले आहे. थकीत कर्जदार शेतकरी पुन्हा कर्जपात्र ठरणार आहेत.

कर्जमाफी योजनेतील निकष, अटी आणि शर्तींमध्ये बदलासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री, सहकारमंत्री यांचा एक मंत्रिगटही कार्यरत आहे. याविषयीची एक उपसमितीही गठीत करण्यात आली आहे. त्यात सचिव आणि इतर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आमदार रोहित पवार, आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी घेतलेल्या आक्षेपांवरही चर्चा झाल्याचे समजते.

2019 मधील शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा फायदा?

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील 12.71 लाख शेतकऱ्यांना सुद्धा नवीन कर्जमाफी योजनाचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीत याबाबत चर्चा झाल्याचे समजते. त्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री लवकरच जाहीर करतील, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत दिली.

प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रिगट उपसमिती

कर्जमाफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या योजनेचा आढावा घेणे आणि योजनेच्या निकषात बदल करण्यासाठी हा मंत्रिगट काम करेल. समितीत दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल, वैद्यकीय शिक्षण, कृषी आणि सहकार मंत्र्यांचा समावेश आहे. ही समिती या योजनेचा नियमित आढावा घेईल. हा मंत्रिगट कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभाविषयी सातत्याने आढावा घेईल.

Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण