AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Good News : ज्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा, आता दरातील चढ-उताराची चिंता मिटली

संकटाची मालिका पार करीत आता रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. एवढेच नाही तर हरभरा या पिकाची आवकही सुरु झाली आहे. असे असतानाही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी-भावाने हरभऱ्याची खरेदी होत नव्हती. त्यामुळे बाजार भावाप्रमाणेच शेतकऱ्यांना विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली असतानाच राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Good News : ज्याची प्रतिक्षा शेतकऱ्यांना तोच निर्णय सरकारचा, आता दरातील चढ-उताराची चिंता मिटली
नाफेडच्यावतीने हरभरा खरेदी केंद्र राज्यभर उभारण्यात आली आहेत.
| Updated on: Feb 18, 2022 | 3:02 PM
Share

लातूर : संकटाची मालिका पार करीत आता (Rabbi Season) रब्बी हंगामही अंतिम टप्प्यात आला आहे. एवढेच नाही तर हरभरा या पिकाची आवकही सुरु झाली आहे. असे असतानाही (Agricultural Produce Market Committee) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमी-भावाने हरभऱ्याची खरेदी होत नव्हती. त्यामुळे बाजार भावाप्रमाणेच शेतकऱ्यांना विक्री करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली असतानाच केंद्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता (Chickpea Crop) हरभराही हमीभावाने विकता येणार आहे. हरभऱ्याला 5 हजार 250 हा हमी भाव ठरवण्यात आला असून आता विक्रीसाठी आवश्यक असलेली नोंदणी ही शेतकऱ्यांना करता येणार आहे. 15 मार्चपर्यंत नोंदणी आणि त्यानंतर प्रत्यक्षात विक्री असे नियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आले आहे. बाजार समिती परिसरात विक्रीसाठीची नोंदणी ही शेतकऱ्यांना करता येणार आहे.

सध्या आहे बाजारपेठेतील दराची स्थिती

रब्बी हंगामातील हरभरा पिकाची आवक सुरु झाली आहे. खुल्या बाजारपेठेत हरभऱ्याला 4 हजार 700 पर्यंत दर मिळाला आहे. मात्र, 5 हजार 250 रुपये क्विटंल हा हमीभावाचा दर असतानाही खरेदी केंद्र उभारली नसल्यामुळे खुल्या बाजारात याच दराने शेतकऱ्यांना विक्री करण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्वरीत हमीभाव केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत असतानाच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खुल्या बाजारपेठेत दर घसरले तरी शेतकऱ्यांना हमीभाव केंद्राचा पर्याय राहणार आहे.

या कागदपत्रांची करावी लागणार पूर्तता

तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ येथे आधार कार्ड, सातबारा, 8 अ उतारा, तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा, आधार लिंक असलेले बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. केंद्राच्या किमान हमीभावानुसार शेतीमाल खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पणन महासंघ, मुंबई, दि विदर्भ सहकारी पणन महासंघ, नागपूर, महाएफपीसी पुणे, पृथ्वाशक्ती फार्मर प्रड्युसर कंपनी, नगर आदींच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे.

कागदपत्रे जमा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत

हमीभाव केंद्रावर कागदपत्रे जमा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे एक महिन्याचा कालावधी असणार आहे. 16 फेब्रुवारीपासून याला सुरवात झाली आहे तर 15 मार्चपर्यंत नोंदणी प्रक्रिया खुली राहणार आहे. शिवाय नोंदणीनुसारच पुन्हा शेतीमालाची खरेदी होणार आहे. खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये म्हणून ही पध्दत सुरु करण्यात आली आहे.नोंदणी करण्याच्या सूचना ह्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Latur Market: सोयाबीनचे दर स्थिरच, आवक मात्र रब्बी हंगामातील पिकांची, काय आहेत मुख्य पिकांचे दर?

रब्बी हंगाम : रात्री अखंडीत अन् दिवसा अनियमित विद्युत पुरवठा, सांगा शेती करायची कशी?

खुशखबर..! ‘ती’ 25 टक्के रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर, काय आहे सरकारचा आदेश?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.