AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी पंपासाठी चार तासच वीज पुरवठा, खरिपात निसर्गाचा लहरीपणा अन् रब्बीत महावितरणचा मनमानी कारभार

पेरणी होताच निसर्गाचा लहरीपणा सुरु झाला होता. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. पेरणीनंतरही अवकाळी, गारपिट या नैसर्गिक संकटावर शेतकऱ्यांनी मात केली पण आता महावितरणच्या मनमानी कारभारासमोर बळीराजा हताश झाला आहे.

कृषी पंपासाठी चार तासच वीज पुरवठा, खरिपात निसर्गाचा लहरीपणा अन् रब्बीत महावितरणचा मनमानी कारभार
विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने पाण्याअभावी वाशिम जिल्ह्यातील पिकांवर परिणाम होत आहे.
Follow us
| Updated on: Feb 16, 2022 | 9:38 AM

वाशिम : खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्याचा निर्धार करुनच शेतकऱ्यांनी (Rabi Season) रब्बी हंगामात चाढ्यावर मूठ धरली होती. मात्र, येथेही संकटाची मालिका ही कायम राहिलेली आहे. पेरणी होताच (The vagaries of nature) निसर्गाचा लहरीपणा सुरु झाला होता. त्यामुळे दुबार पेरणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली. पेरणीनंतरही अवकाळी, गारपिट या नैसर्गिक संकटावर शेतकऱ्यांनी मात केली पण आता महावितरणच्या मनमानी कारभारासमोर बळीराजा हताश झाला आहे. (Agricultural Pump) कृषीपंपासाठी 7 तास विद्युत पुरवठा तो अखंडीत असा नियम असताना वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतशिवारामध्ये केवळ 4 कृषीपंपासाठी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी असतानाही शेतकरी हताश आहे. धरण उशाला अन् कोरड घशाला अशी अवस्था दापुरा उपकेंद्रांतर्गच्या गावातील शेतकऱ्यांची झाली आहे.

नेमकी आडचण काय ?

वाशिम जिल्ह्यातील दापुरा येथील उपकेंद्रात सातत्याने बिघाड होत असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे या उपकेंद्राअंतर्गच्या गावातील रोहित्रांना दिवसातून केवळ चार तास विद्युत पुरवठा केला जात आहेत. तोही अनियमित असल्याने रब्बी हंगामातील पिके जोपासायची कशी असा सवाल शेतकऱ्यांसमोर आहे. मुबलक प्रमाणात पाणीसाठा असतानाही पिके करपून जात आहे. उपकेंद्राच्या पॉइंटवर आलटून पालटून चार तास वीज पुरवठा केला जात असल्याने सुविधांपेक्षा अडचणी अशी अवस्था झाली आहे.

पावसामुळे मुबलक पाणीसाठा

यंदा सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. शिवाय दापुरा उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या इंझोरी शिवारातील इंझोरी शिवारातील नदी, नाल्यांसह विहिरी, कूपनलिकांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. सिचनासाठी मुबलक पाणी असल्याने यंदा इंझोरीसह परिसरातील शिवारात गहू, हरभऱ्यासह रब्बी पिके व भाजीपाला पिकांच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. महिनाभरापासून वारंवार वीज खंडीत होत असून त्यामुळे पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील उत्पादन घटले तर आता महावितरणच्या कारभाराचा फटका रब्बी हंगामात पाहवयास मिळत आहे.

उत्पादनात घट होण्याचा धोका

रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी ही पिके पोषक वातावरणामुळे बहरात आहेत. गेल्या 15 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढता असताना पिके पाण्याला आलेली आहेत. असे असतानाच सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत स्वप्नांचा चुराडा होत आहे. निसर्गापुढे शेतकरी हताश होते पण विद्युत पुरवठ्याची समस्या सोडवता येण्यासारखी असताना महावितरणचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

संबंधित बातम्या :

12 वर्षाची तपश्चर्या आली कामी, संशोधन केंद्राच्या नव्हे तर शेतकऱ्याच्या वाणाला मिळाली मंजुरी..!

सातबारा उताऱ्यावरील ‘पुनर्वसनासाठी राखीव’ शेरे उठणार अन् शेतकऱ्यांना जमिनी परत मिळणार

E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.