Sugar Export : यंदा विक्रमी साखर निर्यात, ऊस गाळप अन् निर्यातीमध्येही महाराष्ट्र नंबर ‘वन’

ज्याप्रमाणे यंदा उसाच्या गाळपाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे साखर निर्यातही महत्वाची आहे. कारण देशांतर्गत साखरेचे दर हे कमी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक साखर निर्यात झाली तरच येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच विशेष प्रयत्न करुन निर्यात वाढवली जात आहे. शिवाय निर्यातदारांचे हे प्रयत्नही यशस्वीही होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत 72 लाख टन साखरेचा निर्यात झाली आहे तर यंदा 90 लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचा 'इस्मा' चा अंदाज आहे.

Sugar Export : यंदा विक्रमी साखर निर्यात, ऊस गाळप अन् निर्यातीमध्येही महाराष्ट्र नंबर 'वन'
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:50 AM

मुंबई : ज्याप्रमाणे यंदा (Sugarcane Sludge) उसाच्या गाळपाचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहे त्याचप्रमाणे साखर निर्यातही महत्वाची आहे. कारण देशांतर्गत साखरेचे दर हे कमी होत आहे. त्यामुळे अधिकाधिक (Sugar Export) साखर निर्यात झाली तरच येथील (Farmer) शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळेच विशेष प्रयत्न करुन निर्यात वाढवली जात आहे. शिवाय निर्यातदारांचे हे प्रयत्नही यशस्वीही होताना दिसत आहे. कारण आतापर्यंत 72 लाख टन साखरेचा निर्यात झाली आहे तर यंदा 90 लाख टन साखरेची निर्यात होणार असल्याचा ‘इस्मा’ चा अंदाज आहे. पण सध्याचे गाळप पाहता यापेक्षा अधिक निर्यात होणार आहे. निर्यातीमध्ये इतिहास होत असला तरी राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आहे. त्यामुळे वाढत्या उत्पदनाबरोबर हा प्रश्नही मार्गी लावणे गरजेचे आहे.

साखर निर्यात झाली तरच फायदा

ऊस गाळप हंगामाला 6 महिने पूर्ण झाले तरी राज्यात आणि देशात अतिरिक्त उसाचा प्रश्न हा कायम आहे. केवळ महाराष्ट्रात तब्बल 80 लाख टन उसाचे गाळप होणे शिल्लक आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक निर्यात यंदा होण्याचा अंदाज आहे. कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दरही टिकून आहेत. याचाच फायदा देशातील निर्यातदारांना आणि साखर उत्पादकांना होत आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत साखरेचे दर हे कमी आहेत. त्यामुळे निर्यातीसाठीच अधिक प्रयत्न हे केले जात असून यंदा विक्रमी साखर निर्यात होणार असल्याचा अंदाज ‘इस्मा’नेच वर्तवला आहे.

82 लाख टन साखर निर्याताचे करार

साखरेचे वाढते उत्पन्न पाहता निर्यातीवरही भर दिला जात आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असला तरी साखर निर्यातीचे धोरण ठरवले जात आहे. अजूनही महिनाभर का होईना उसाचे गाळप हे सुरुच राहणार आहे. त्यामुळे 90 लाख टन साखरेचे निर्यात करण्याचे उद्दीष्ट निर्यातदारांचे राहणार आहे. आतापर्यंत प्रत्यक्षात 72 लाख टन साखर करारानुसार निर्यात झाली आहे तर 82 लाख टन साखर निर्यातीचे करार झाले आहेत. सध्याची परस्थिती पाहता उद्दीष्टापेक्षा अधिक साखर निर्यात होईल असा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्राची भूमिका काय?

केवळ ऊस गाळपातच नाही तर साखर निर्यातीमध्येही महाराष्ट्र आघाडीवर आहे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्र हे गाळपात आणि साखर निर्यातीमध्ये ‘नंबर वन’ वर राहिले आहे. देशातून 72 लाख टन साखरेची निर्यात झाली असली तरी यापैकी महाराष्ट्रातून 45 लाख टन साखरेचा समावेश आहे. 2013-14 पासून आतापर्यंत 291 टक्क्यांनी साखर निर्यात वाढलेली आहे. भारतामधून जगातील 121 देशांमध्ये साखर निर्यात केली जात असून त्याचा फायदा साखर कारखाने तसेच निर्यातदारांना होत आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market: तुरीच्या दराला उतरती कळा, शेतकऱ्यांसमोर आता एकच पर्याय..!

PM Kisan Yojna : सर्वात मोठ्या कृषी योजनेत अनियमितता, लाखो अपात्र शेतकऱ्यांनी घेतला लाभ, आता वसुलीचे उद्दीष्ट

Sugarcane : ऊस तोडणीसाठी आता परराज्यातील यंत्रे, महिन्याभरात लागणार अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.