पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ अन् रोगराईलाही प्रतिबंध

पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही केले जात आहे. उत्पादनवाढीसाठी पेरणीच्या आगोदरही प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यामुळेच बीजप्रक्रीयेला अधिकचे महत्व आले आहे. सर्वजण बीजप्रक्रीया करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात मात्र, ही बीजप्रक्रीया आहे तरी काय आणि पिकासाठी याचा काय फायदा होणार हे आपण पाहणार आहोत.

पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ अन् रोगराईलाही प्रतिबंध
संग्रहीत छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 2:55 PM

लातूर : सध्या शेतशिवारात एकच लगबग सुरु आहे ती (Rabbi Season) रब्बी हंगामाची. काही जिल्ह्यांमध्ये पेरणीचा श्रीगणेशा झाला आहे तर काही भागात पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु आहेत. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हे नुकसान भरुन काढण्यासाठी रब्बी हंगामातील पिकांचे (Option of production growth) उत्पादन वाढविणे हाच पर्याय आता शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जोडीला कृषी विभागही बांधावर जाऊन मार्गदर्शन करीत आहे. यंदा हरभऱ्याची विक्रमी पेरा होईल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवलेला आहे. शिवाय पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी याचे मार्गदर्शनही केले जात आहे. उत्पादनवाढीसाठी पेरणीच्या आगोदरही प्रयत्न होणे गरजेचे आहे. (Seed processing) त्यामुळेच बीजप्रक्रियेला अधिकचे महत्व आले आहे. सर्वजण बीजप्रक्रीया करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देतात मात्र, ही बीजप्रक्रीया आहे तरी काय आणि पिकासाठी याचा काय फायदा होणार हे आपण पाहणार आहोत.

उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगामच महत्वाचा आहे. यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन या मुख्य पिकाचे नुकसान झाले होते. शिवाय उडीद वगळता इतर पिकांनाही अधिकचा दर नाही. खरीपात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठी शेतकरी आता सज्ज झाला आहे. पण त्यापुर्वी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये बीजप्रक्रीया हा महत्वाचा घटक मानला जात आहे.

नेमकी बीजप्रक्रिया कशी केली जाते ?

बीजप्रक्रिया ही अत्यंत साधा आणि सोपी पध्दत पण तेवढीच महत्वाची आहे. कारण यावरचे पीकाची उगवणक्षमता अवलंबून असते. तर पेरणीपूर्वी अवघ्या एक ते दोन तास आगोदर शेतकऱ्यांनी जे बियाणेची पेरणी करायची आहे त्या एक किलो प्रति बियाणाला 3 ग्रॅम थायराम किंवा कॅप्टन अन्यथा बाविस्टीन यापैकी एकाने ते बियाणात मिसळयाचे आहे. त्यानंतर रायझोबियम या जीवाणू संवर्धकाची 10 मिली प्रति 1 किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रीया करुन हे बियाणे सावलीत वाळवून लगेच पेरणी करावी लागणार आहे. मात्र, वरती सांगितल्याप्रमाणेच शेतकऱ्यांनी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

बीजप्रक्रियेचे फायदे काय आहेत ?

बीजप्रक्रिया करुन योग्य अंतरावर पेरणी केली तर उगवण क्षमता ही चांगली होणार आहे. शिवाय उगवून आलेल्या झाडांची मर होत नाही. एवढेच नाही तर भविष्यात रब्बी हंगामातील पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

शेतकऱ्यांनी आगोदर फर्टीलायझरची बीजप्रक्रीया करायची आहे. त्यानंतर बायोफर्टीलायजरची बीजप्रक्रिया ही महत्वाची आहे. हा क्रम चुकला तर बीजप्रक्रियेचा काही उपयोग होणार नाही. पेरणीपूर्वी ही प्रक्रिया अगदी काही वेळेची असली तरी उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची असल्याचे गंगाखेडचे तालुका कृषी अधिकारी बनसावडे यांनी सांगितले आहे.

सध्या शेतीशाळांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन

रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी कशा पध्दतीने परेणी करावी याबाबत शेती कार्यशाळा घेतल्या जात आहेत. या दरम्यान, बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करुन दाखवले जात आहे. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बीजप्रक्रिया केल्याशिवाय पेरणीच करु नये

दरवर्षी शेतकरी हे पारंपारिक पध्दतीने पेरणीला सुरवात करतात. पण यंदा बीजप्रक्रिया करुनच पेरणी करावी लागणार आहे. म्हणेज रासायनिक खताची मिसळण किंवा जैविक पध्दतीने ही बीजप्रक्रिया करावी लागणार आहे.यामुळे हरभऱ्याला जो मर रोगाचा धोका असतो तो कमी होतो. शिवाय यंदा अधिकच्या पावसामुळे जमिनीत पाणी आहे. त्यामुळे जमिनीत बुरशीचेही प्रमाण असणार आहे. यापासून पेरणी केलेल्या बियाला धोका होऊ नये म्हणून ही बीजप्रक्रिया महत्वाची आहे. (Seed processing is essential before sowing, increase in production and freedom from pests)

संबंधित बातम्या :

यशोगाथा : खडकावर बहरलीय सिताफळीची बाग अन् उत्पन्न मिळतंय लाखात

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर दारी, मात्र, नियम अटींचे करावे लागणार पालन

शेतकऱ्यांसमोर हाच पर्याय : खराब सोयाबीनची विक्री अन् चांगल्या मालाची साठवणूक

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.