Latur Market : दर स्थिर असूनही सोयाबीनची विक्रमी आवक, केंद्राच्या निर्णयामुळे तुरीच्या दरात घसरण सुरुच

साठा केलेल्या सोयाबीन विक्रीचा निर्णय अखेर शेतकऱ्यांनी घेतला की काय अशीच सध्याची परस्थिती आहे. कारण दिवसेंदिवस सोयाबीनची आवक ही वाढत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करताना बाजारपेठेचा अभ्यास करुनच निर्णय घेतला आहे. पण गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिरच आहे.

Latur Market : दर स्थिर असूनही सोयाबीनची विक्रमी आवक, केंद्राच्या निर्णयामुळे तुरीच्या दरात घसरण सुरुच
सोयाबीनच्या दरात घट झाली आहे तर शेतीमालाची आवकही घटलेलीच आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 3:13 PM

लातूर : साठा केलेल्या (Sale of soyabean) सोयाबीन विक्रीचा निर्णय अखेर शेतकऱ्यांनी घेतला की काय अशीच सध्याची परस्थिती आहे. कारण दिवसेंदिवस (Soybean Arrival) सोयाबीनची आवक ही वाढत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करताना (Latur Market) बाजारपेठेचा अभ्यास करुनच निर्णय घेतला आहे. पण गेल्या 15 दिवसांपासून सोयाबीनचे दर हे स्थिरच आहे. शिवाय आता उन्हाळी हंगामातील सोयाबीनच्या काढणीलाही सुरवात होईल त्याअनुशंगाने शेतकरी सोयाबीनची विक्री करु लागले आहेत तर दुसरीकडे तुरीच्या आयातीबाबत केंद्राने घेतलेल्या निर्णयाचा परिणाम जाणवू लागला आहे. सध्या तुरीचे दर 6 हजार पर्यंत येऊन ठेपले आहेत. तुरीच्या मुक्त आयातीच्या मुदतीमध्ये वाढ केल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

40 हजार पोत्यांची आवक होऊनही सोयाबीन स्थिरच

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदाच सोयाबीनची आवक कमी होत आहे .दरवर्षी हंगामात 50 ते 60 हजार पोत्यांची आवक ही सुरु असते पण यंदा शेतकऱ्यांनी आखडता हात घेतला आहे. पण गेल्या 8 दिवसांपासून परस्थिती बदलत आहे. सोयाबीनचे दर स्थिर असतानाही आवक मात्र, वाढत आहे. येथील मार्केटमध्ये 40 सोयाबीनच्या पोत्यांची आवक झाली होती. यंदाच्या हंगामातील ही सर्वाधिक आवक मानली जात आहे. दरवाढीच्या आशा संपुष्टात येत असल्यानेही आवकमध्ये फरक पडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

सरकारच्या निर्णयाचा फटका तूर उत्पादकांना

तूर मुक्त आयातीचे धोरण ठरले होते. शिवाय ते मार्चपासून बंद करणार येणार होते. पण केंद्र सरकारने याला वाढीव मुदत दिली आहे. म्हणजे अजून वर्षभर मुक्त आयातीचे सूत्र हे सुरुच राहणार आहे. यामुळे परदेशातील तूर मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यास येथील शेतीमालाला दर कसा मिळेल असा सवाल उपस्थित होत आहे. आता वर्षभर म्यानमार, बर्मा, मालावी, केनिया यासह इतर देशातून तुरीची आवक कायम राहणार आहे. त्यामुळेच तुरीच्या दरात घसरण होत असल्याचा अंदाज आहे.

मुख्य शेतीमालाचे दर अन् आवक

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरु आहे. यापूर्वी हरभऱ्याची आवक वाढली होती पण हमीभाव केंद्राप्रमाणेही दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आता साठवणूकीला सुरवात केली. बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला 4 हजार 600 पर्यंत सरासरी दर मिळत आहे तर हमीभाव केंद्रावर 5 हजार 230 रुपये असा दर ठरवून देण्यात आला आहे. सोयाबीन 7 हजार 250 तर तूर 6 हजार 50 रुपयांपर्यंत विकली जात आहे.

संबंधित बातम्या :

Latur : ऊन – पावसाच्या खेळात हंगामी पिकेही धोक्यात, कलिंगडच्या उत्पादनात घट

Solapur : शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नावर ‘स्वाभिमानी’ची हुंकार यात्रा,राजू शेट्टींनी सांगितले ऊस शेतीचे गणित!

Amravati : सोयाबीन बहरुनही उत्पादन घटण्याचा धोका, हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकरी हवालदिल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.