सोयाबीनचे दर स्थिर, उडदाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग

आठवड्याच्या (latur) पहिल्याच दिवशी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली होती. तब्बल दोन हजाराने घट झाल्याने आज मंगळवारच्या बाजारात काय चित्र राहते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारीही सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अचानक दर (Market) कमी झाल्याने आता यामध्ये वाढ होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

सोयाबीनचे दर स्थिर, उडदाच्या दरात घसरण, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग
संग्रहीत छायाचित्र

लातूर : आठवड्याच्या (latur) पहिल्याच दिवशी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात कमालीची घट झाली होती. तब्बल दोन हजाराने घट झाल्याने आज मंगळवारच्या बाजारात काय चित्र राहते याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, मंगळवारीही सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अचानक दर (Market) कमी झाल्याने आता यामध्ये वाढ होणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

चार दिवसांपासून सोयाबीनची आवक नियमित होत आहे. दिवसाकाठी लातूर येथील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये 40 हजार कट्टे सोयाबीन येत आहे. उस्मानाबाद, बीड, सोलापूर, कर्नाटक या ठिकाणाहुन सोयाबीनची आवक ही लातूरच्या बाजारात होते. हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनचे दर हे 8 हजार ते 8 हजार 500 वर स्थिरावले होते. मात्र, सोमवारी सोयाबीनची आवक वाढली आणि दर हे कोसळले. सध्या सोयाबीनला 6300 एवढा दर मिळत आहे. दोन दिवसापूर्वी 8 हजारावर असलेले सोयाबीन थेट 6 हजारवर आल्याने याचा परिणाम आवकवर होणार का हे पहावे लागणार आहे.

मंगळवारी सोयाबीनला 6300 असा सरासरी दर होता. तर सोमवारी 7300 रुपये क्विंटल असलेला उडीद मंगळारी मात्र, 7200 रुपयांवर आला होता. खरीप हंगामातील पिकांची आता आवक सुरु झाली आहे. मात्र, दराचा अंदाज शेतकऱ्यांना येत नसल्याने सोयाबीनची विक्री करयाची की साठवूण ठेवणे चांगले राहील या संभ्रम अवस्थेत शेतकरी आहे.

चार पटीने वाढली सोयाबीनची आवक

सोयाबीनची आवक ही झपाट्याने वाढत आहे तर त्याच तुलनेत दरावरही त्याचा परिणाम हा होत आहे. सोयाबीनवरच शेतकऱ्यांची मदार आहे. यापुर्वी पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. आता योग्य दर मिळाला तर उत्पादनावर झालेला खर्च निघेल असा आशावाद शेतकऱ्यांना होता मात्र, गेल्या दोन दिवसातील दर पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहेच. मंगळवारी बाजार समितीमध्ये तब्बल 30 हजार कट्ट्यांची आवक झाली होती. शनिवारी सोयाबीनची आवत ही 10 हजार कट्ट्यांची होती. आता नविन सोयाबीन दाखल होत असून अशीच अवस्था राहीली सोयाबीनचे दर आणखीन घटतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतर शेतीमालाचे कसे आहेत दर

लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुपारी 12 च्या दरम्यान शेतीमालाचे सौदे होतात. मंगळवारी लाल तूर- 6460 रुपये क्विंटल, पांढरी तूर 6525 रुपये क्विंटल, पिंकू तूर 6355 रुपये क्विंटल, जानकी चना 5050 रुपये क्विंटल, विजय चणा 5300, चना मिल 5000, सोयाबीन 6300, चमकी मूग 6650, मिल मूग 6300 तर उडीदाचा दर 7100 एवढा राहिला होता.

सोयाबीनमुळे शेतकऱ्यांची द्वीधा मनस्थिती

सोयाबीनमधूनच शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी आशा आहे मात्र, बाजार पेठेतही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. कारण पावसाने सोयाबीनचे मोठे नुकसान झाले होते. उत्पदनावर केलेला खर्च तरी या विक्रीतून होईल असा आशावाद शेतकऱ्यांना होता मात्र, बाजापेठेतील चित्र हे वेगळेच आहे. शिवाय अजून उशीरा पेरणी झालेले सोयाबीन हे वावरातच आहे. त्यामुळे तोपर्यंत दराची काय स्थिती होणार याची चिंता शेतकऱ्याना आहे. (soyabean-prices-stable-urad-prices-fall-farmers-worried)

संबंधित बातम्या :

तरुण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर : शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना, कार्यप्रणाली अन् सरकारचा काय आहे उद्देश

पीक पेऱ्याच्या नोंदी वाढवण्यासाठी नांदेड प्रशासनाचा अभिनव उपक्रम, गाव स्तरावर यंत्रणा

‘एफआरपी’ चा साखर कारखानदारांना विसर, राज्यातील कारखान्यांकडे कोट्यावधीची थकबाकी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI